क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील सुपर स्पोर्ट्स क्लब आयोजित तिसऱया सुपर चषक सीक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने बुफा संघाचा 2-1 असा पराभव करून तिसरा सुपर चषक पटकाविला. श्रीनन पाटील याला अष्टपैलू खेळाडू तर साईश अगरवाडेकर याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.
युनियन जिमखानाच्या फुटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने तिरंगा ब संघाचा 1-0 असा पराभव केला. दुसऱया सत्रात मंथन गावकरच्या पासवर सुनील भांदुर्गेने एकमेव गोल केला. या सामन्यात तिरंगा संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. दुसऱया उपांत्य सामन्यात बुफा संघाने मझर युनायटेड संघाचा 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीनन पाटीलने 4 तर श्री ने 2 गोल केले. तिसऱया क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मझर युनायटेड संघाने तिरंगा संघाचा टायब्ा्रsकरमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला.
अंतिम सामन्यात केआर शेट्टी किंग्ज संघाने बुफा संघाचा 2-1 असा पराभव केला.
या सामन्यात पहिल्या सत्रात मंथन गावकरने गोल करून 1-0 ची आघाडी केआर शेट्टी संघाला मिळवून दिली. दुसऱया सत्राच्या चौथ्या मिनिटाला बुफा संघाच्या श्रीनन पाटीलने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना जयेश सांबरेकरने गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला.
ज्येष्ठांसाठी प्रदर्शनीय सामना
या स्पर्धेवेळी ज्ये÷ फुटबॉलपटूंना वाव देण्यासाठी तिरंगा विरूद्ध फ्रेंन्ड्स यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. या सामन्यात फ्रेंन्ड्स संघाने टायब्रेकरवर विजय संपादन केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरण निपाणीकर, जयराज व प्रणय शेट्टी यांच्या हस्ते विजेत्या केआर शेट्टी संघाला 30 हजार रूपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या बुफा संघाला 15 हजार रूपये व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून साईश आगरवाडेकर (केआर शेट्टी), स्पर्धेतील सर्वाधिक गोल मंथन गावकर (केआर शेट्टी) तर अष्टपैलू खेळाडू श्रीनन पाटील (बुफा) यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चेतन कोठारी, अभिलाष कसोटी, आता पठाण, नुमान पठाण, अंजला पठाण, अझर शेख, अबुझर बिस्ती, सुफियान यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून इम्रान बेपारी यांनी काम पाहिले.