प्रतिनिधी /फोंडा
धारदार चाकू आणि बियर बाटल्याच्या थरारासह दोन गटात झालेल्या मारमारीत एकूण सहा जणांना फोंडा पोलिसांनी काल बुधवारी अटक केली आहे. इलाही मुनोहाली (26), मंजूनाथ चव्हाण (22), तौसीफ नदाफ (20), विशाल चव्हाण (22), सादीक बडेसाहब गजबीनवार (23), साहील रफिक शेख (18) सर्व राहणारे शापूर फोंडा येथील अशी त्याची नावे आहेत. सदर घटना मंगळवार उशिरा रात्री घडली होती.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी उशिरा रात्री दोन गटामतध्ये पुर्व वैमन्यसातून मारामारीची घटना घडली. यावेळी बियरच्या बाटल्या व धारदार चाकूने एकमेकांना जखमी करण्यात आले. फोंडा पोलिसानी संशयिताविरोधात सार्वजनिक शांतता बिघडवण्य़ाचा टपका ठेवत दोन्ही गटातील एकूण सहा जणाविरोधात विविध कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक साजिथ पिल्ले अधिक तपास करीत आहे.