Tarun Bharat

मोहोळ – पंढरपूर रोडवर कारच्या अपघातात सहा ठार

मोहोळचे डॉक्टर पती- पत्नी, मेव्हणे, दोन मुलांचा मृत्यू -अपघातानंतर गाडीचा चक्काचूर झालेला होता

प्रतिनिधी/मोहोळ

रत्नागिरी येथे भावाचे लग्न आटोपून परत गावाकडे येत असताना काळाने घाला घातल्याने पंढपूर – मोहोळ रोडवर कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये दोन चिमुकल्यासह डॉक्टर महिलासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. ही दुर्घटना रविवार 23 मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोहोळ तालुक्मयातील पेनुर गावच्या शिवारात रमेश माने यांच्या ढाब्या समोर पंढरपूर पालखी मार्गावर घडली.

सेलेरो कार व स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले. इरफान नुरखॉ खान (वय 40), बेनजीर इरफान खान (वय 37), मुजाहिद इरफान आतार (वय 37), आफरीन मुजाहिद आतार (वय 27), इनाया इरफान खान (वय 2), अराफत मुजाहिद आतार (वय 10, रा. सर्व रा. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. तर अरहान इरफान खान 10 वर्षे (रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी 35, मनिषा मोहन हुंडेकरी 30 वर्षे (दोघे रा. गादेगाव ता. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत.

मोहोळ येथील भाऊजी व मेव्हणा असे खान व आतार कुटुंबीय उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी येथे गेले होते. येताना जयसिगपुर येथे भावाच्या लग्नाना उपस्थित राहून परत रविवार 21 मे रोजी ते सेलेरो कारने (क्रमांक एम एच 13 डीटी 8701) मोहोळ कडे परतत होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान त्यांची चार महिन्यापुर्वी नवीन घेतलेली सेलोरो कार पेनुर गावच्या शिवारातील माळी पाटी परिसरातून येत असताना मोहोळहुन पंढरपूरकडे भरधाव वेगात निघालेल्या स्कॉर्पिओने (क्रमांक एम एच 13 डी.ई. 1242) त्यांच्या कारला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तर तिघे हे गंभीर जखमी झाले.

या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशा चक्काचूर झाला. गाडीतील साहित्य विखुरले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी सुमारे एक तासाने घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. सध्या जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्मयात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

अपघातास कारणीभूत ठरल्याबदल रस्त्याचे काम करणाऱया ठेकेदावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका नातेवाइकांनी घेतली.

मृतांमध्ये दोन डॉक्टर, दोन चिमुकल्याचा समावेश…
मुजाहिद इमरान आतार व त्यांची पत्नी आफ्रीन मुजाहिद आतार हे दोघे डॉक्टर आहेत. या अपघातात त्यांच्यासह त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अराफत मुजाहिद आतार व दोन वषीय भाची इनाया इरफान खान ठार झाले आहेत.

Advertisements

Related Stories

उद्यापासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू : वर्षा गायकवाड

Rohan_P

सोलापूर : हे सरकार आंधळे, बहिरे आणि मुके : सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde

विमान लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने अशरफ गनी पोहचले ओमानमध्ये

Abhijeet Shinde

केंद्राने गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंधावर आणली शिथिलता

Abhijeet Khandekar

कोरोनावरील दोन नवीन लसी आणि एका गोळीला मंजूरी

Abhijeet Shinde

संभाजीराजेंनी घेतली संजय राऊत यांची भेट

datta jadhav
error: Content is protected !!