Tarun Bharat

बेळगावातून सहा जण तडीपार मटका, जुगार, बेकायदा दारूप्रकरणी कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

मटका, जुगार, बेकायदा दारूविक्री आदी गैरधंद्यांत गुंतलेल्या सहा जणांना बेळगाव येथून तडीपार करण्यात आले आहे. गुऊवारी पोलीस उपायुक्तांनी यासंबंधीचा आदेश जारी केला असून सहापैकी पाच जणांना अटक करून त्यांना बळ्ळारी, कोप्पळ, विजयनगर जिल्ह्यात धाडण्यात आले आहे.

 पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी ही माहिती दिली आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी केलेल्या शिफारसीनुसार कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी सहा जणांना तडीपार करण्याचा आदेश बजावला आहे.

मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील तीन, माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील दोन व शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून एक अशा एकूण सहा जणांना तडीपार केले आहे. पाच जणांना गुऊवारी अटक केली असून आणखी एक जण फरारी असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यासंबंधी पोलीस आयुक्तांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. अवैधधंद्यात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांना इशारा देण्यासाठी ही कारवाई केली असून मटका, जुगार, अमलीपदार्थांची विक्री आदीविषयी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.

Related Stories

खानापुरात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप

Amit Kulkarni

मण्णिकेरी येथील ‘त्या’ जवानावर आज अंत्यसंस्कार

Patil_p

डीजेचा ठेका अन् सामूहिक विसर्जन

Amit Kulkarni

तालुक्यात दिवाळीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात

Patil_p

ग्रा. पं. जमिनींवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

Omkar B

वाढत्या कोरोनामुळे पिरनवाडी परिसरात पुन्हा बंदोबस्त

Amit Kulkarni