Tarun Bharat

RSS ची सहा कार्यालये बॉम्बने उडविण्याची धमकी

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) सहा कार्यालये बॉम्बने उडविण्याची धमकी एका विदेशी क्रमांकावरून देण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील दोन आणि कर्नाटकातील चार कार्यालयांचा समावेश आहे. या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणेची भंबेरी उडाली असून, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीलकंठ पुजारींना व्हॉट्सऍपवर यासंदर्भातील मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि नवाबगंजसह कर्नाटकातील चार कार्यालये बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी मडिगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे.

डॉ. नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. ते आरएसएसचे जुने स्वयंसेवक आहेत. त्यांना हिंदी, इंग्लिश आणि कन्नड भाषेत धमकीचे मेसेज मिळाले आहेत. या मेसेजमध्ये आरएसएसच्या उत्तरप्रदेशसह कर्नाटकच्या सहा ठिकाणांना रविवारी रात्री आठ वाजता बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली. एका व्हॉट्सऍप ग्रुपवर हिंदी भाषेत V 49R + J8 g नवाबगंज उत्तर प्रदेश 271304 असे लिहिले आहे. तुमच्या सहा पक्षाच्या कार्यालयावर 8 वाजता बॉम्बस्फोट होईल. तुम्हाला शक्य असल्यास, स्फोट थांबवा. नवाबगंज व्यतिरिक्त लखनऊच्या सेक्टर क्यूमध्ये असलेल्या सरस्वती विद्या मंदिराचाही उल्लेख करण्यात आला आहे. मडियाव पोलीस धमकी देणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

Related Stories

सात राज्यांमध्ये उष्मालाटेचा कहर

Amit Kulkarni

चिन्हांवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल…

Archana Banage

व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी नवी नियमावली जारी

Patil_p

शिवसेना खासदारांची कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Sumit Tambekar

धारावीत सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा, ठाकरे गटातील ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Archana Banage

मुखवटा कंपन्यांच्या विरोधात अमेरिकेत अत्यंत कठोर कायदा

Patil_p
error: Content is protected !!