क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळविलेल्या देवण बामणेचा आयुर जीमतर्फे सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत इनलाईन हॉकी प्रकारात देवणने दोन कांस्यपदके पटकावून यश संपादन केले. देवन बामणे हा फिजिकल फिटनेससाठी आयुर जिममध्ये सराव करत असतो. त्याने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन आयुर जिमचे संचालक मंडळ श्रेयस गुरव, जोतिबा राजाई, राष्ट्रीय पंच सुनील राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्याचा गौरव करण्यात आला यावेळी मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित, वेदांत बामणे, वेदांत मोरे, भक्ती हिंडलगेकर आदी उपस्थित होते.