पाय साखळदंडात आहेत कैद
रक्तपिपासू पिशाच्चांशी निगडित अनेक कहाण्या आतापर्यंत ऐकल्या असतील. पंतु पोलंडच्या एका गावात ‘वॅम्पायर’चा सांगाडा मिळाला आहे. मृत लोक वॅम्पायरचे रुप घेत परतू नये म्हणून याच्या गळय़ाच्या चहुबाजूला धारदार अस्त्र ठेवण्यात आले होते. तसेच पायांना साखळदंडात कैद करण्यात आले होते. हा सांगाडा पिएनगावात 17 व्या शतकातील दफनभूमीत पुरातत्व सर्वेक्षणादरम्यान आढळला आहे. सांगाडय़ाच्या डोक्याच्या भागात एक रेशीमची टोपी होती.
या व्यक्तीला असामान्य स्वरुपात दफन करण्यात आले होते. मेलेला माणूस परत जिवंत होऊन येऊ नये म्हणून त्याचे पाय किंवा शीर तोडणे किंवा त्याला पेटवून देणे सामील हाते. परंतु ज्याप्रकारे हा मृतदेह दफन करण्यात आला आहे, ते अत्यंत विचित्र आहे. धारदार अस्त्र त्याच्या गळय़ानजीक ठेवण्यात आले आहे, जेणेकरून मृत पुन्हा जिवंत झाल्यास त्याचे शीर धडावेगळे व्हावे यासाठी हे करण्यात आले होते असे निकोलस कोपर्निकस विद्यापीठाचे टीम लीडर प्राध्यापक डेरियस पोलिन्सकी यांनी म्हटले आहे.
पायांना टाळे ठोकून कैद करणे म्हणजे एक जीवन पूर्णपणे बंद झाले असून येथे पुन्हा परत येण्याची चावी नसल्याचे प्रतीक असल्याचे संशोधकांचे मानणे आहे. 11 व्या शतकाच्या सुमारास पूर्व युरोपमधील काही भागांमध्ये ज्या लोकांना दफन करण्यात आले आहे, ते रक्तपिपासू वॅम्पायर होत परतू शकतात अशी भीती होती असे संशोधकांकडून सांगण्यात आले.
वॅम्पायरच्या कहाण्या
युरोपच्या काही भागांमध्ये विशेषकरून स्लाव लोकांमध्ये पिशाच्चांशी निगडित कहाण्या भीती निर्माण करत होत्या. एकेकाळी तर जिवंत लोकांनाही पिशाच्च मानले जात होते. ज्या लोकांचा अकाली मृत्यू व्हायचा किंवा जे आत्महत्या करायचे, त्यांना पिशाच्च होणारा समजले जात होते. ते परतू नयेत म्हणून अशाप्रकारचे उपाय योजिले जात होते.
आणखी 5 मृतदेह
2015 मध्ये याच ठिकाणापासून 200 किलोमीटर अंतरावरील ड्रूस्को गावात एका 400 वर्षे जुन्या दफनभूमीत अशाचप्रकारे दफन करण्यात आलेले 5 सांगाडे मिळाले होते. यात 35-44 वयोगटातील एका पुरुषाचा तर 35-39 वयोगटातील महिलेचा मृतदेह सामील होता. दोघांच्या गळय़ाभोवती धारदार अस्त्र ठेवण्यात आले होते. 50-60 वयोगटातील महिलेच्या मृतदेहाच्या कंबरेवरही धारदार अस्त्र ठेवण्यात आले होते. याचबरोबर एक किशोरवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता.