काॅलेज किंवा ऑफिसवर्क करत असताना चेहऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जस आपण निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करतो. आणि आपल एक नियमित रूटीन ठरवतो. तसंच चेहऱ्याची स्किन चांगली ठेवण्यासाठी स्किन केअर रुटिंग असण खूप गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकवेळी सगळे प्रोडक्ट विकत घेणं परवडत नाही. यासाठी घरच्या घरी असलेल्या पदार्थांचा वापर करून स्किनची काळजी कशी घ्यायची हे आज तुम्हाला सांगणार आहोत. कसे चला तर जाणून घेऊया.
क्लिजर
दिवसभर उन्हात किंवा ऑफिसवर्क करून आपला चेहरा थकून जातो. घरी आल्यानंतर आपण चेहरा फेशवाॅशने क्लिन करतो. मात्र चेहरा क्लिंजिंग होत नाही. तुम्हाला जर एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवलेलं क्लिजर वापरून चेहरा स्वच्छ करू शकता. यासाठी अंबेहळद, बेसनपीठ, मसूरडाळ आणि गुलाबपाण्याचा वापर करा. दोन चमचे बेसनपीठात १ चमचा हळद आणि गुलाबपाणी घाला. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. ज्यांना बेसनपीठाची अॅलर्जी आहे त्यांनी मसूरडाळीचं पीठ वापरा. हे लावून झाल्यानंतर चेहऱ्य़ाला सुकू द्या त्या नंतर थंड पाण्याने चेहरा वाॅश करा.
स्क्रबर
चेहऱ्याला क्लिझर केल्यानंतर स्क्रब करावं लागत यासाठी २ किंवा तीन चमचे काॅफी घ्या त्यात थोडा मध घाला. दोन्ही मिश्रण मिक्स करून स्क्रब करून घ्या. थोडा वेळ चेहऱ्यावर तसंच ठेवा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हे तुम्ही हाताला आणि पायाला वापरू शकता.
टोनर
घरी टोनर बनवण्यासाठी थोड पाणी घ्या त्यात गावठी गुलाबाच्या पाकळ्या आणि एक कापराची वडी घाला. गॅसवर मंद आचेवर उकळून घ्या. नंतर गाळून त्याचा वापर करा.
फेसपॅक
क्लिजर, स्क्रबर आणि टोनर लावून झाल्यानंतर फेसपॅक लावावा लागतो. यासाठी तांदळाचं पीठ, चंदन पावडर, तुळशीची पाने आणि गुलाब पाणी घ्या. हा पॅक दोन ते तीन वेळा लावा. ज्यांची ऑईली स्किन आहे. त्य़ांनी मुलतानी माती, मध आणि गुलाबपानी वापरून फेसपॅक बनवा आणि वापरा.
माॅश्चराईझर
यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बेबी ऑईल, बदाम तेल याचा वापर करू शकता, किंवा गाईच्या तुपात थोडीशी हळद घाला आणि माॅश्चराईझर करा. रात्रभर चेहऱ्याला चांगल माॅश्चराईझर होईल आणि तुमचा चेहरा सुंदर दिसण्यास मदत होईल.
टीप- याचा वापर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करा. तुम्हाला फरक जाणवेल. तसेच याचा कोणताही साईडईफेक्ट होणार नाही.


previous post