Tarun Bharat

चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी ?…. जाणून घ्या

चेहऱ्याची सुंदरता त्वचेच्या टाईटनेसवर अवलंबून असते. सामान्यपणे हे पाहिलं जातं की, वयाच्या ३० व्या वर्षांनंतर चेहऱ्याची टाईटनेस कमी होऊ लागते. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याची टाईटनेस कायम राहिल.

चेहऱ्याला मसाज करण्याचे फायदे-
चेहऱ्याची त्वचा सैलसर न पडता टाईट राहण्यास मदत होते.- त्वचा सैल पडून त्यावर सुरकुत्या येत नाहीत.- चेहरा सुजल्यासारखा दिसत नाही.- चेहऱ्यावर अतिरिक्त चरबीचे थर साचत नाहीत.- चेहऱ्याला मसाज केल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे व्यवस्थित रक्ताभिसरण होते. यामुळे चेहरा चमकदार, तजेलदार आणि तरुण दिसू लागतो.

ऑलिव्ह ऑईलचा
मसाज केल्याने तुमची त्वचा लवकर घट्ट होण्यास आणि सैलपणापासून मुक्त होण्यास मदत होते. तेलाने मसाज केल्याने तुमची त्वचा घट्ट होतेच पण त्यामुळे तुमची त्वचा अधिक निरोगी राहते. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता.

नारळाचं तेल आणि कॉफी
नारळाचे तेल तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत . खोबरेल तेलाने मसाज करू शकता आणि हवे असेल तर तुम्ही त्यात कॉफी देखील मिक्स करू शकता, यामुळे तुमच्या त्वचेत जास्त काळ ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

फेस पॅक
फेस पॅक च्या मदतीने तुमच्या त्वचेतील ढिलेपणा दूर होतो आणि घट्टपणा वाढतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा पॅक लावू शकता.

प्रोटीन डाएट
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सकस आहार घ्यावा. जर तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवले ​​तर ते तुमच्या त्वचेतील कोलेजन देखील वाढवते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा घट्ट होताना पाहू शकता.

व्यायाम
पाणी तुमच्या त्वचेला दीर्घकाळ ओलावा देऊन निरोगी ठेवण्याचे काम करते. दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्या. व्यायाम तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतो, त्याचप्रमाणे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम पर्याय आहे, तुम्ही दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

अॅस्ट्रिजेंटचा वापर
स्किन टोनरप्रमाणे अॅस्ट्रिजेंट सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे. बाजारात हे सहजपणे उपलब्ध होतं. याचा वापर केल्याने त्वचेची टाईटनेस कायम राहते.Related Stories

जाणून घ्या बडीशेपचे आरोग्यदायी फायदे

Kalyani Amanagi

थंडीत मुलायम हातांसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स!

Kalyani Amanagi

समस्या स्ट्रेचमार्कस्ची

Omkar B

कोविडनंतरचा मधुमेह

Amit Kulkarni

लाहानबाळांचा पचनसमस्या

Amit Kulkarni

सोरायसिसच्या अंतरंगात….

Omkar B