वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
सध्या येथे सुरू असलेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिदर नाईटला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे. तिच्या मांडीला स्नायू दुखापत झाली असून ती बरी होण्यास काही वेळ लागणार आहे. आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यासाठी इंग्लंडची कर्णधार नाईट उपलब्ध होऊ शकणार नाही.
या स्पर्धेतील महिलांच्या टी-20 या क्रीडा प्रकारातील दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात खेळताना नाईटला ही दुखापत झाली होती. नाईटच्या गैरहजेरीत आता इंग्लंड महिला संघाचे नेतृत्व नॅट स्किवेरकडे सोपविण्यात आले आहे. इंग्लंडच्या महिला संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून पहिल्या सामन्यात त्यांनी लंकेचा पाच गडय़ानी पराभव केला. त्यानंतर दुसऱया सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 26 धावांनी पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. ब गटातून इंग्लंडचा संघ चार गुणासह दुसऱया स्थानावर आहे. या गटात न्यूझीलंडने चार गुण मिळविले असले तरी ते सरस धाव सरासरीच्या जोरावर आघाडीवर आहेत.