Tarun Bharat

रेल्वेत झोपा आता बिनधास्त…स्थानक येण्यापूर्वी वाजेल वेकअप अलार्म

रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या टेनमधून प्रवास करणाऱ्यांना सोयीचे; नाममात्र शुल्काची आकारणी

रेल्वे प्रवासा दरम्यान आपल्याला हव्या त्या स्टेशनवर उतरायचे राहील या काळजीने अनेकांना झोप लागत नाही. अशा प्रवाशांनी आता रेल्वेमध्ये आरामात झोप घेतली तरी चालणार आहे. कारण, झोपलेल्या प्रवाशांना त्यांचे इच्छित स्थानक येताच जागे करण्याची जबाबदारी रेल्वेने घेतली आहे. कारण, रेल्वे स्थानक येण्याच्या 20 मिनिटे आधी ‘वेकअप अलार्म’ पाठवून प्रवाशांना जागे केले जाणार आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा अधिक फायदा होणार आहे. अनेकदा प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांचे इच्छित स्टेशन मागे सुटून जाते व नंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान या सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.

असे करेल वेकअप अलार्म काम
रात्री प्रवास करणाऱया प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या मोबाईलवर वेकअप अलार्म पाठवण्यात येईल. हा अलार्म स्थानक येण्यापूर्वी वीस मिनिटे आधी पाठविला जाईल. जेणेकरून प्रवासी जागे होतील आणि उतरण्यास तयार राहतील.

असा घ्या सुविधेचा लाभ
रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या टेनमधून प्रवास करणारा कोणताही प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी त्याला त्याच्या मोबाईलवरून 139 या आयआरसीटीसी हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागेल. कॉल केल्यानंतर प्रवाशाला भाषा निवडण्यासाठी पर्याय दिला जाईल. यानंतर, वेकअप डेस्टिनेशन अलर्टसाठी सात आणि नंतर दोन हे आकडे दाबावे लागतील. नंतर प्रवाशाला त्याचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. पीएनआर क्रमांक (PNR Number) भरल्यानंतर एक अंक दाबून त्याची पुष्टी करावी लागेल. हे केल्यानंतर प्रवाशाचे इच्छित स्टेशन सेट केले जाईल आणि ते स्थानक येण्याच्या 20 मिनिटांपूर्वी त्याला अलर्ट मिळेल. तुम्ही जर रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
ठळक बाबी…..

  • रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध
  • विशेष म्हणजे या सुविधेसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत
  • यासाठी रेल्वे प्रवाशांकडून फक्त तीन रुपये आकारले जाणार
  • स्थानक येण्यापूर्वी 20 मिनिटे आधी पाठविला जाईल वेकअप अलार्म
  • रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवासा दरम्यान तुम्हालाही घेता येईल या सुविधेचा लाभ

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे मनसेकडून स्वागत

Tousif Mujawar

वेदांताकडे किती खंडणी मागितली? आदित्य ठाकरेंनी याची माहिती द्यावी

datta jadhav

शिक्षण क्षेत्रातील संस्कार केंद्र असलेल्या विद्यालयांमध्ये महिलांचा वाटा अमूल्य

Tousif Mujawar

यावर्षीचाही शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे संभाजीराजेंचे शिवभक्तांना आवाहन

Archana Banage

जमावबंदीतही MIM चा मोर्चा मुंबईत धडकणार?

datta jadhav

सोलापूर ग्रामीणमध्ये ६ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage