Tarun Bharat

झोपण्याचा विक्रम : 6 लाख कमावले

Advertisements

पश्चिम बंगाल राज्यातील एका युवतीने सलग 100 दिवस प्रतिदिन 9 तास झोपण्याचा विक्रम केला आहे. तिने झोपण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन या विक्रमामुळे 6 लाख रुपयांची कमाई केली आहे. या युवतीचे नाव त्रिपर्णा असे असून ती हुगळी येथील रहिवासी आहे. तिने या स्पर्धेत साडेचार लाख स्पर्धकांचा पराभव केला. या विक्रमाचे वैशिष्टय़ असे, की तिने प्रतिदिन 9 तास झोप दिवसा घेतली होती. तर रात्री पूर्णपणे जागून काढल्या होत्या. ही स्पर्धा अखिल भारतीय पातळीवर आयोजित करण्यात आली होती. साडेचार लाख स्पर्धकांपैकी अंतिम फेऱयांसाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी शेवटच्या फेरीपर्यंत केवळ चार स्पर्धक टिकून राहिले. या चार स्पर्धकांमध्ये त्रिपर्णाने बाजी मारली.

लहानपणापासूनच आपण झोपाळू म्हणून प्रसिद्ध होतो, असे तिने स्पर्धा जिंकल्यानंतर सांगितले. या स्पर्धेची माहिती तिला एका वेबसाईटच्या माध्यमातून मिळाली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत झोपण्यासाठी एक गादी आणि एक स्लीप ट्रकर प्रत्येक स्पर्धेकाला देण्यात आला होता. ट्रकरच्या माध्यमातून स्पर्धक नेमका किती वेळ झोपला, याचा हिशेब केला गेला होता. लहानपणापासून आपण दिवसभरात केव्हाही झोपण्यासाठी प्रसिद्ध होतो, कुठेही लवंडले तरी आपल्याला झोप लागत असे. याच सवयीचा फायदा या स्पर्धेत मिळाल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Related Stories

सर्वात वळणदार मार्ग

Patil_p

एक शरीर, दोन जीव

Patil_p

हार्मोन असंतुलनावर शीर्षासन हा उपाय

Amit Kulkarni

आता आकाशातून फूड डिलिव्हरी

Amit Kulkarni

खेळणीमुळे मुलांना मिळते शिक्षण

Patil_p

लोखंडी फुफ्फुसांमध्ये अलेक्झेंडरचे जग

Amit Kulkarni
error: Content is protected !!