Tarun Bharat

स्मार्ट सिटीचे काम; मनपा कर्मचाऱयांना फुटला घाम

भुयारी गटार फोडून राबविली स्वच्छता मोहीम : गटारीत कचऱयाचा ढीग

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काही ठिकाणी पाईप घालून गटार निर्माण करण्यात आली आहे. काही ठिकाणी सीडी बांधण्यात आली आहे. पण चेंबर ठेवण्यात आले नसल्याने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील भुयारी गटार फोडण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचाऱयांवर आली. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम अन् मनपा कर्मचाऱयांना फुटला घाम, अशी स्थिती निर्माण झाली होती.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोणतीच कामे व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. गटारींचा स्लोप त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्टय़ा रस्त्यांची बांधणी झाली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र स्मार्ट सिटी कंपनीने केलेल्या कामाचा फटका आता शहरवासियांना बसू लागला आहे. विविध ठिकाणी निर्माण होणाऱया समस्यांची डोकेदुखी महापालिकेला झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील खडेबाजार कॉर्नर येथे असलेली भुयारी गटार कचऱयाने तुडुंब भरली आहे. गटारीचे बांधकाम करताना जलवाहिन्या आणि टेलिफोन केबल गटारीच्या खाली किंवा वरच्या भागात घालणे आवश्यक होते. पण जलवाहिन्या व टेलिफोन केबल तसेच ठेवून बांधकाम करण्यात आल्याने कचरा साचत आहे. संगोळ्ळी रायण्णा सर्कलकडून फोर्टरोडकडे जाणाऱया गटारीतील सांडपाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे याची पाहणी केली असता खडेबाजार कॉर्नरजवळील भुयारी गटारीत कचरा साचल्याचे आढळून आले.

पण कचरा काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने चेंबर सोडले नव्हते. त्यामुळे गटारीची स्वच्छता करण्यास गेलेल्या मनपा अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना गटार फोडण्याची वेळ आली. येथील काही व्यावसायिकांनी गटारीवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे अतिक्रमण हटवून गटार फोडण्यात आली. त्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या असा विविध कचरा काढण्यात आला. त्यामुळे मनपा कर्मचाऱयांना मोठी अडचण झाली. त्यामुळे गटार फोडताना कर्मचाऱयांना घाम फुटला.

Related Stories

वसंत व्याख्यानमालेची बैठक संपन्न

Patil_p

जिल्हय़ातील तलावांची पुनर्खोदाई करणे गरजेचे

Amit Kulkarni

मजगाव महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात

Omkar B

पीडीओंचा प्रताप; कंत्राटदारांच्या डोक्याला ताप

Amit Kulkarni

खंजर गल्लीत मटका अड्डय़ावर छापा

Patil_p

‘श्रीमंतयोगी’मधून शिवचरित्राचे दर्शन

Amit Kulkarni