Tarun Bharat

स्मार्टफोन ‘ओप्पो ए57’ भारतात दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओप्पो कंपनीने भारतामध्ये आपला नवीन स्मार्टफोन दाखल केला असून यामध्ये ओप्पो ए57(2022) हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. सदरच्या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि मिडियाटेक जी3 5 प्रोसेसरचा समावेश आहे. हा फोन 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि 5,000 एमएएच क्षमतेच्या बॅटरीसह मिळणार आहे.

Advertisements

ओप्पो ए57 ची किंमत

ओप्पो ए57 (2022) या स्मार्टफोनचे एकच मॉडेल आता सादर केले असून यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसोबत उपलब्ध होणार असून याची किंमत ही 13,999 इतकी राहणार असल्याची माहिती आहे.

सदरचा नवा कंपनीचा स्मार्टफोन दोन रंगामध्ये उपलब्ध होणार असून तो ग्लोइंग ग्रीन आणि ग्लोइंग ब्लॅकमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याची खरेदी ही कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटवर करता येणार आहे.

स्मार्टफोनमधील फिचर्स

w ओप्पो ए57 मध्ये 6.56 इंचाचा डिस्प्ले

wनवीन स्मार्टफोनमध्ये बायोमॅट्रिक्ससाठी फिंगरप्रिंट व फेशियल रिकग्निशन सपोर्ट आहे.

wफोनचे इनबिल्ट स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढू शकते

wफोटोग्राफीसाठी डबल रियर कॅमेरा सेटअप

wस्मार्टफोन 15 मिनिटात पूर्ण चार्ज होणार असल्याचा दावा

Related Stories

‘वन प्लस’ची भारतीय बाजारावर नजर

Patil_p

प्रवासातील मार्गदर्शक

Omkar B

‘टेक्नो’चा पहिला 5जी स्मार्टफोन लाँच

Patil_p

3 महिन्यात 5 कोटी स्मार्टफोन्सची जम्बो विक्री

Patil_p

गॅलक्सी एफ 62 सहा हजारांनी स्वस्त

Amit Kulkarni

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!