दिवसा 4 तास मोबाइल वापरल्याचा परिणाम : मुलांना अधिक प्रमाणात ओरडण्याचा प्रकार
मोबाइल फोन आणि अन्य डिजिटल उपकरणांचा दिवसातील 4 तास वापर करणाऱया पालकांचा स्वतःच्या अपत्यांबद्दलचे वर्तन बदलते. कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीच्या रिसर्च स्कॉलर्सनी 5-18 वयोगटातील दोन मुले असलेल्या 549 आईवडिलांचे सर्वेक्षण केले आहे.
या सर्वेक्षणात जे पालक रिकामी वेळेत किंवा आराम करताना फोन किंवा इतर डिजिटल माध्यमांच्या संपर्कात राहतात, ते स्वतःच्या मुलांबद्दल चिडचिड करू लागतात असे आढळून आले आहे. विनाकारण मुलांना दूर लोटण्यासह ओरडू लागतात. मोबाइल फोन किंवा अन्य डिजिटल उपकरणांचा वापर करणाऱया पालकांपैकी 75 जणांना नैराश्याचीही समस्या होती.
हे संशोधन कोरोना संकटादरम्यान झाले आहे. यात स्क्रीन टाइम आणि डिजिटल माध्यमांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचे यात आढळून आले. पालक सरासरी दिवसातील 3-4 तास डिजिटल मीडियाचा वापर करतात. वॉटरलू युनिव्हर्सिटीत क्लीनिकल सायकोलॉजीच्या स्कॉलर आणि या संशोधनाच्या मुख्य लेखिका जास्मीन झांग याची माहिती दिली आहे.
कुटुंब म्हणून पालक आणि मुले दोघांचेही वर्तन महत्त्वाचे असते, अशा स्थितीत मोबाइलच्या वापरामुळे पालकांच्या वर्तनावर नकारात्मक प्रभाव पडत असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल डिव्हाइसचा वाढलेला स्क्रीन टाइम आणि वर्तनातील चिडचिड यामध्ये कनेक्शन आढळून आले आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये संभाषण कमी झाल्यावर पालकत्वाशी संबंधित खराब सवयी समोर येऊ लागल्याचे दिसून आल्याचे झांग यांनी सांगितले.
सामाजिक सक्रीयता जे पालक सोशल मीडियावर दिवसभरात 1 किंवा 2 तास घालवत होते, त्यांचे मुलांबद्दलचे वर्तन अधिक सकारात्मक होते. आईवडिलांनी सामाजिक स्वरुपात अधिक सक्रीय असायला हवे असे झांग यांनी म्हटले आहे.