वृत्तसंस्था/ दुबई
2022 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीने महिलांचा वनडे संघ जाहीर केला असून या संघात भारताच्या तीन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना आणि वेगवान गोलंदाज रेणुकासिंग ठाकुर यांचा यामध्ये सहभाग आहे. मंगळवारी आयसीसीने महिला वनडे संघाची घोषणा केली. आयसीसी वनडे महिला संघ- अॅलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), बेथ मनी (ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना (भारत), हरमनप्रित कौर (भारत), रेणुकासिंग ठाकुर (भारत), लॉरा वुलव्हर्ट (दक्षिण आफ्रिका), नॅट स्किव्हेर (इंग्लंड), अॅमेलिया केर (न्यूझीलंड), सोफी इक्लेस्टोन (इंग्लंड), ए. खाका (दक्षिण आफ्रिका), शबनीम इस्माईल (दक्षिण आफ्रिका).