Tarun Bharat

‘गुजरातची जनता तुम्हाला धडा शिकवेल’;स्मृती इराणी अरविंद केजरीवाल यांच्यावर भडकल्या

Smriti Irani On Arvind Kejriwal: आपचे नेते गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.या घटनेनंतर आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. भाजप नेत्यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी संताप व्यक्त केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे तुकडे होणार,गुजरातची जनता तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा आज त्यांनी दिला आहे. तसेच गटाराचं तोंड असणारे गोपाल इटालिया आता तुमच्या आशीर्वादाने हिरा बा यांना शिव्या देत आहेत असं त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख करीत म्हटलंय.

यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या, “अरविंद केजरीवाल जी तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्म दिलेल्या महिलेला शिवीगाळ करत आहेत. गुजरातची जनता पंतप्रधानांच्या आईचा अपमान सहन करणार नाही. पंतप्रधानांच्या आईचा अपमान केल्यानंतर तुम्हाला राजकीय लोकप्रियता मिळेल हा तुमचा भ्रम आहे.येत्या निवडणुकीत गुजरातचे लोक तुम्हाला धडा शिकवतील, तुम्हाला राजकीय किंमत मोजावी लागेल. आम आदमी पक्षाने गुजरातींच्या भावना दुखावल्या आहेत.गुजरातच्या जनतेने आता शपथ घेतली आहे की, येत्या विधानसभा निवडणुकीत ते तुम्हाला धडा शिकवतील असा सूचक इशारा त्यांनी दिला.

Related Stories

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.44 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

आणखी एका शेतकऱयाची गाझीपूर सीमेवर आत्महत्या

Patil_p

मध्यरात्री मंदिरे उघडण्यास विरोध

Patil_p

अशी ही नवी पिढी!

Patil_p

व्हीव्हीआयपींना मिळणार आयईडीच्या धोक्यापासुन सुरक्षा

Amit Kulkarni

पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पपूर्व बैठक

Patil_p