ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात 2.5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पुस्तकांच्या पानांमधून सोन्याची तस्करी करत होते. या दोघांकडून पुस्तकांच्या पानांमध्ये लपवलेले 90,000 USD आणि अंडरगारमेंटमध्ये लपवलेले पेस्ट स्वरूपातील एकूण 2.5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. 22 आणि 23 जानेवारीला कस्टम्स विभागाने ही कारवाई केली.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडीत घट