Tarun Bharat

स्नॅपडील कंपनीचा आयपीओ योजना रद्द

प्रस्तावासह कागदपत्रे घेतली मागे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलने बाजारातील नकारात्मक परिस्थितीमुळे आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) योजना थांबवली आहे. कंपनीने ही माहिती दिली.

स्नॅपडील आयपीओ अंतर्गत 1,250 कोटी रुपये किमतीचे नवीन इक्विटी शेअर्स सादर केले जाणार होते आणि तीन कोटी समभागांच्या विक्रीसाठी ऑफर करणार होते. आयपीओसाठी अद्याप कोणतीही नवीन मुदत निश्चित केलेली नाही.

स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सध्याच्या बाजारातील परिस्थिती पाहता, कंपनीने मसुदा दस्तऐवज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी भविष्यात आयपीओचा विचार करू शकते आणि ते बाजारातील परिस्थिती आणि वाढीसाठी भांडवलाची गरज यावर अवलंबून असेल.’

एकेकाळी ई-कॉमर्स क्षेत्रातील पॉवरहाऊस असलेल्या स्नॅपडीलला ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्याकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागला. त्याच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱया 90 टक्क्यांहून अधिक उत्पादनांची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि 80 टक्क्यांहून अधिक ग्राहक हे छोटय़ा शहरांमध्ये आहेत.

Related Stories

संपामुळे सेल, आरआयएनएल प्रकल्पातील उत्पादन प्रभावीत

Patil_p

टेक कंपन्यांमध्ये कपात सुरुच

Patil_p

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम !

Patil_p

झी एन्टरटेनमेन्टचे बाजारमूल्य 70 हजार कोटीवर पोहचणार ?

Amit Kulkarni

अदानी विल्मरचा समभाग घसरला

Amit Kulkarni

‘चिप’च्या कमतरतेमुळे संकट निर्माण होण्याचे संकेत

Patil_p