Tarun Bharat

सिंधुदुर्गाची सागरकन्या स्नेहा नार्वेकर हिने केला विश्वविक्रम

Advertisements

14 वर्षाखालील गटात भारत देशांत विश्वविक्रमाची नोंद करणारी देशातील पहिला मुलगी

वेंगुर्ले (भरत सातोस्कर)-

वेंगुर्ल्यातील अरबी समुद्रामध्ये बॅक किक स्विमिंग करत 20 मिनिटांमध्ये 12 रुबिक क्युब अंतर सहजपणे पार करून भारत देशांत 14 वर्षाखालील वयोगटामध्ये विश्वविक्रमाची नोंद सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वेंगुर्ले या शहरातील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केली आहे. असा विश्वविक्रम करणारी हि भारतातील पहिली मुलगी आहे.सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वेंगुर्ले या शहरात रहाणारी, मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्लेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणारी स्नेहा रंजन नार्वेकर हि एका शेतकऱ्याची मुलगी आहे. तिची आई गृहिणी आहे. 

तसेच, स्विमिंगचे कोच दिपक सावंत यांच्याकडून ती वयाच्या चौथ्या वर्षापासूनच स्विमिंगचे धडे घेत आहे. तिने वेंगुर्ल्यातील अरबी समुद्रामध्ये बॅक किक स्विमिंग करत 20 मिनिटांमध्ये 12 रुबिक क्युब अंतर यशस्वीपणे सॉल केले. 14 वर्षाखालील मुली वयोगटामध्ये विश्वविक्रम करणारी हि भारतातील पहिली मुलगी आहे. म्हणून तिच्या या रेकॉर्डची दखल, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाचे महाराष्ट्र-गोवा राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले नगर परीषदेच्या स्विमिंग हॉलमध्ये स्नेहा रंजन नार्वेकर हिला सर्टिफिकेट व मेडल देऊन तिला गौरविण्यात आले. 

या विशेष  सोहळय़ात स्नेहा नार्वेकरचे आई, वडील व प्रशिक्षक दीपक सावंत याचाही सन्मान करण्यात आला. यावेळी कलावंलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, नारायण बर्वे, राजेंद्र प्रभु-साळगांवकर, अमेय रेडकर, मानसी रेडकर, राहुल कांबळे, तुषार परब, गणेश तारी, दिगंबर वाडकर, ध्रुव गवंडळकर, स्मिता शिवलकर, नुपूर शिवलकर आदी उपस्थित होते.Attachments area

Related Stories

राडुकानू तिसऱया फेरीत, ओसाका, मुगुरूझा पराभूत

Patil_p

हॅले स्पर्धेत पोलंडचा हुरकाझ अजिंक्य

Patil_p

भारताला हरवून दक्षिण कोरिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

रात्रीची एफ-वन मोटार शर्यत लास व्हेगासमध्ये

Amit Kulkarni

दापोलीत ‘लॉकडाऊन’नंतर प्रथमच ‘लालपरी’ मार्गस्थ

Patil_p

किल्ले सिंधुदुर्गला २१ हजार पर्यटकांची भेट

NIKHIL_N
error: Content is protected !!