Tarun Bharat

आतापर्यंत 13 हजार जनावरांना लम्पिस्कीन प्रतिबंधक लस

Advertisements

रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न ः गावोगावी लसीकरण मोहीम

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील काही दिवसांपासून तालुक्मयात लम्पिस्कीनने (त्वचा रोग) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 300 जनावरांना या रोगाची लागण झाली असून 44 रोगमुक्त झाली आहेत, तर 12 जनावरे दगावली आहेत. दरम्यान, पशुसंगोपन खात्याने लम्पिस्कीन प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तालुक्मयातील 13 हजार 500 जनावरांना ही प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामुळे रोग आटोक्मयात येईल, अशी आशा पशुसंगोपनने व्यक्त केली आहे.

विशेषतः तालुक्मयाच्या पूर्व भागामध्ये मागील 15 दिवसांपासून या रोगाची लागण सुरू आहे. सांबरा, मुतगा, निलजी, बसरीकट्टी, शिंदोळी, कणबर्गी, सुळेभावी, मारिहाळ, चंदगड-अष्टे आदी भागात या रोगाची अधिक लागण झाली आहे. आतापर्यंत बारा जनावरे या रोगाने दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीती पसरली आहे. गतवषीदेखील हंदिगनूर भागात या रोगाची जनावरे आढळून आली होती. मात्र, यंदा या रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दगावणाऱया जनावरांची संख्या वाढली आहे. दरम्यान, रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बाधित जनावरांच्या गोठय़ापर्यंत उपचार पुरविण्यासाठी रॅपिड ऍक्शन पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय गावोगावी लम्पिस्कीन प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

तालुक्मयातील पूर्व भागात अधिक प्रादुर्भाव असला तरी इतर ठिकाणी फैलाव होऊ नये, यासाठी सर्वच गावांतील जनावरांना प्रतिबंधक लस टोचली जात आहे. तालुक्मयात 52 हजार गायी आणि बैलांची संख्या आहे. त्यापैकी 13 हजार 500 जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांनादेखील लस देण्यासाठी पथक गावोगावी फिरत आहे.

तालुक्मयात लम्पिस्कीन संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गावोगावी जागृती  केली जात आहे. शिवाय जनावरांचे बाजार आणि शर्यतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे शनिवारी एपीएमसी येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. पुढील आदेश आल्यानंतरच बाजार सुरू होणार आहे.

या संसर्गजन्य आजाराची झपाटय़ाने लागण होत असल्याने शेतकऱयांनी जनावरे बाहेर सोडू नयेत, शिवाय विक्रीसाठी बाहेर नेऊ नये, गोठय़ात स्वच्छता ठेवून धूर करावा, लागण झाल्यास जनावर स्वतंत्र बांधावे, तसेच लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 गाय-बैलांमध्ये लक्षणे अधिक

तालुक्मयाच्या पूर्व भागात या आजाराची लागण झाली आहे. मात्र, संपूर्ण तालुक्मयातच प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. बाधित जनावरे बरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. गाय आणि बैलांमध्ये ही लक्षणे अधिक असल्याने प्रथमतः गाय आणि बैलांनाच लस दिली जात आहे.

                                   -डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)   

Related Stories

गौरव देसाई राऊंड टेबल चेअरमनपदी

Amit Kulkarni

जीवनविद्या मिशनतर्फे युवकांसाठी 17 रोजी व्याख्यान

Amit Kulkarni

समस्या सोडविण्यासाठी लघु उद्योजक आले एकत्र

Patil_p

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रामदुर्गमध्ये रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

परराज्यामधून येणाऱया नागरिकांची गर्दी ओसरली

Patil_p

बेळगाव शहरासह तालुक्यात हुडहुडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!