अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर संख्या वाढण्याची शक्यता. उमेदवारांकडे बोलणी, आमिषे, दबावतंत्राचा वापर
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील चार पंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागामध्ये केवळ एकाच उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केल्याने सदर चारही उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. आज बुध. दि. 27 रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत जर दुहेरी लढत असलेल्या प्रभागांमधील एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास सदर उमेदवारही बिनविरोध निवडून येण्यची शक्मयता आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱया उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्मयता आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी काही उमेदवारांकडे बोलणी तसेच आमिषे व दबावतंत्रही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मये पंचायतीच्या प्रभाग क्र. 11 मध्ये माजी पंचसदस्य तुळशीदास चोडणकर यांची पत्नी सुवर्णा चोडणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ओबीसी राखीव असलेल्या या प्रभागात सुवर्णा चोडणकर यांच्या व्यतिरिक्त अन्य एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने त्यांना थेट संधी मिळाली आहे. सुवर्णा चोडणकर यांनी 2012 ते 2017 या कार्यकाळात मये पंचायतीत पंचसदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
पिळगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 3 या एसटी राखीव प्रभागात चेतन विष्णू खोडगिणकर याची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी या प्रभागाचे प्रतिनिधित्व माजी पंचसदस्या उर्मिला उमाकांत गावकर यांनी केले होते. त्यांनी व त्यांचे पती उमाकांत आपा गावकर या प्रभागात पंचायतीमार्फत तसेच वैयक्तिक पातळीवर केलेल्या कामांमुळे लोकांची त्यांना पसंती होती. मात्र सदर प्रभाग एसटी राखीव झाल्याने चेतन खोडगिणकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड थेट ठरली आहे.
अडवलपाल पंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये गितेश पुंडलिक गडेकर यांचा एकमेव अर्ज अंतिम यादीत राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर लाटंबार्से पंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये कृष्णा प्रकाश आरोलकर यांच्याविरोधात इतर कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी न भरल्याने तेही बिनविरोध पंचसदस्य म्हणून निवडले गेले आहेत. वरील दोन्ही बिनविरोध निवडून आलेले पंचसदस्य डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांच्या समर्थक गटातील असल्याची माहिती मिळाली आहे.