Tarun Bharat

..तर आण्विक हल्ला करू!

Advertisements

रशियाकडून अमेरिकेला धमकी ः युक्रेनमधील डोनबास गिळपृंत करण्याची तयारी

वृत्तसंस्था / मॉस्को

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. देशाला संबोधित करताना पुतीन यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना धमकी देत कुणीही आण्विक हल्ल्याच्या इशाऱयाला थट्टेवारी नेऊ नये असे म्हटले आहे. पाश्चिमात्य देश रशियाला उद्ध्वस्त आणि कमकुवत करण्याचा कट रचत आहेत. या देशांनी आता मर्यादा ओलांडली आहे. रशियाला धोका उद्भवल्यास आण्विक हल्ला करणार आहोत. आण्विक इशाऱयाला ड्रामा समजू नये असे पुतीन यांनी म्हटले आहे.

पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांवर ‘न्युक्लियर ब्लॅकमेलिंग’चा आरोप केला आहे. नाटोचे काही मोठे नेते  रशियाच्या विरोधात अण्वस्त्र वापरण्याची धमकी देत आहेत. पाश्चिमात्य देश अण्वस्त्रांच्या वापरावरून ब्लॅकमेल करत असल्यास रशिया पूर्ण शक्तिनिशी प्रत्युत्तर देणार आहे. आम्ही आमच्या देशाच्या रक्षणासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो असे पुतीन म्हणाले.

पुतीन यांनी स्वतःच्या संबोधनात युक्रेनमध्ये अधिक सैनिक पाठविण्याच्या मुद्दय़ावर भर दिला आहे. तसेच सैन्याच्या मोबिलायजेशनवरून एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याच्या अंतर्गत रशिया 3 लाख राखीव सैनिकांना तैनात करण्यात येणार आहेत. पुतीन यांनी रशियाचे सैन्यबळ वाढविण्यासह युक्रेनच्या डोनबास प्रांतावर कब्जा करण्याची तयारी गतिमान केली आहे. डोनबासह रशिया युक्रेनधील खेरसॉन आणि जपोरिजियाला स्वतःमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करत आहे. पुतीन यांनी या भागांमध्ये जनमत चाचणी करविण्याचा आदेश दिला आहे. रशियाच्या लोकांच्या रक्षणासाठी तत्काळ निर्णय घेणे आवश्यक होते असे पुतीन यांनी म्हटले आहे.

पुतीन यांच्या या आदेशामुळे आगामी दिवसांमध्ये डोनेट्स्क, लुहान्स्क, खेरसॉन आणि जपोरिजिया येथे राहणारे लोक रशियात सामील होण्याच्या मुद्दय़ावरून मतदान करणार आहेत. या भागात रशियन भाषिक लोकांची संख्या तुलनेत अधिक आहे. या भागावर रशियाने कब्जा केल्यास युक्रेनच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या जाणार आहेत.

7 महिन्यांपासून युद्ध सुरू

रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी बुधवारी रशियात आंशिक स्वरुपात तैनातीची घोषणा केली आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुमारे 7 महिन्यांपासून सुरू आहे. युकेनमध्ये रशियाच्या कब्जातील क्षेत्रांकडून रशियात सामील होण्याच्या मुद्दय़ावर मतदान घेण्याच्या घोषणेच्या दुसऱया दिवशी पुतीन यांनी देशाला संबोधित केले आहे. युक्रेन युद्धाच्या प्रारंभिक महिन्यांमध्ये जनमत चाचणी रशियाकडून करविण्यात येईल अशी  शक्यता वर्तविण्यात येत होती. लुहान्स्क, खेरसॉन, आणि जपोरिजिया तसेच डोनेट्स्कमध्ये ही कथित जनमत जाचणी शुक्रवारी होणार आहे.

Related Stories

ट्विटरच्या सीईओंकडून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी साडेसात हजार कोटींची मदत

prashant_c

महाराणी, युवराजांचे लसीकरण

Patil_p

फ्लोरिडात इयान वादळामुळे नुकसान : 2 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

शेमार मूर बाधित

Omkar B

नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकन

Patil_p

अमेरिकेत 55 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav
error: Content is protected !!