Tarun Bharat

उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

पुणे / प्रतिनिधी :

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून येत्या 3 डिसेंबरला जनआक्रोश मेळावा घेण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून अवमानाची दखल घेतली जात नसेल, तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी रविवारी भाजपला लगावला.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनाची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा-समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, त्यांच्या विचारांना आदर्श मानतात. मात्र, दुसरीकडे महाराजांबद्दल लेखन, चित्रपट आणि वक्तव्यातून अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही? तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल, मग महाराजांचे नाव का घेता, असा उद्विग्न सवालदेखील उदयनराजेंनी राजकीय पक्षांना केला. याबाबतच देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना 3 डिसेंबरनंतर भेटू व याबाबत गाऱ्हाणे मांडू, असे उदयनराजे यांनी सांगितले.

अधिक वाचा : ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन; 50 फूट खोल कालव्यात कोसळली फॉर्च्युनर

प्रत्येकजण राजकारण करणार असेल, बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई होणार नसेल, तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. महाराजांची अवहेलना होत असताना त्याबाबत सर्व पक्षप्रमुखांनी आपली स्पष्ट भूमिका मांडावी. शासनाच्या वतीने महाराजांचा इतिहास अधिकृतपणे अद्यापही मांडण्यात आलेला नाही. तो मांडायला हवा. राज्यपालांवर कारवाई करणार नसाल, तर महाराजांचे नाव घेऊ नका, असा घरचा आहेरही उदयनराजे यांनी भाजपला दिला. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करा. या प्रकरणाची दखल घेतली नाही, तर निवडणुकीमध्ये जनता त्याची दखल घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Stories

चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर घणाघात;राज्यातील 63 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला

Archana Banage

कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

Archana Banage

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नाही, शिथिलता देण्यात येणार – राजेश टोपे

Archana Banage

हिमाचल प्रदेश : 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार लसीकरणाचा दुसरा टप्पा

Tousif Mujawar

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Archana Banage

सदरबझार परिसरात घरफोडी; मंगळसूत्र लंपास

Patil_p