Tarun Bharat

…तर पुढचे पाऊल ‘महाराष्ट्र बंद’चे

पुणे / प्रतिनिधी :

बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांनी एकदा नव्हे, तर दोन वेळा असे केले. त्यामुळे आता ऍक्शन घेण्याची वेळ आली असून, राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा, अन्यथा ‘महाराष्ट्र बंद’चे पाऊल उचलू, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje chhatrapati) यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध करीत विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी बंदचे आवाहन करण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ संभाजीराजे पिंपरी येथे आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांनी राज्यपालांचा निषेध करत त्यांनी सरकारला इशारा दिला.

संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र हे इतर राज्यांना दिशा देणारे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. मात्र, महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत आपण चर्चा करत बसलो आहोत. त्यामुळे आपण एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची गरज नाही का? म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये हे आंदोलन होत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराजांचा दोनवेळा अवमान केला. त्यांची हिंमत होतेच कशी? त्यानंतरही काही लोक त्यांना पाठिंबा कसे देतात, हा मोठा प्रश्न आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीची विधाने केली आहेत. त्यांचे धाडस तरी कसे होते?

अधिक वाचा : ‘मॅन्दोस’ आज रात्री महाबलीपूरमजवळ धडकणार

काय निरोप पोहोचविला? फडणवीसांना प्रश्न

आपला निरोप आम्ही पोहोचविला, असे सांगण्यात येते. कुठल्या ठिकाणी निरोप पोहोचवायचा आहे ते सांगा, हे तर सांगा की काय निरोप पोहोचवला? महाराष्ट्रातून कोश्यारींची हकालपट्टी व्हायला पाहिजे, हा निरोप तुम्ही पोहोचवला का, असा प्रश्न करीत संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

प्रत्येक शहरातील आंदोलनात सहभागी होणार

राज्यपालांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहील. प्रत्येक शहरातील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे. पिंपरी-चिंचवड हे उद्योगांचे शहर आहे. या शहरातून सुरू झालेल्या आंदोलनाचा हा प्रवास ‘महाराष्ट्र बंद’च्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना लवकर महाराष्ट्राबाहेर पाठवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

Related Stories

वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका; अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Archana Banage

पालिका करणार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

Patil_p

दिवाळी खरेदीचा सुपर संडे

Patil_p

सोमय्यांचे नवं टि्वट ;संजय राऊत यांचे सहकारी पाटकर रडारवर

Archana Banage

“पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट” – सरन्यायाधीश

Archana Banage

भारताने आफ्रिकन देशांसोबत भागीदारी वाढविणे गरजेचे

datta jadhav