Tarun Bharat

…तर शाळा आम्ही चालवतो!

Advertisements

आम आदमी पार्टीचे आव्हान : शिक्षण संचालकांना निवेदन सादर

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील प्राथमिक चालविणे जमत नसल्याचे सरकारने मान्य करावे, त्यांची जबाबदारी घेण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान आम आदमी पक्षाने दिले आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांच्या विलिनीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करणारे निवेदन मंगळवारी पक्षाने शिक्षण संचालकांना सुपूर्द केले आहे.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी वरील माहिती दिली. पालेकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेऊन सरकारी प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त करतांना पालेकर यांनी विलीन होणाऱया सरकारी प्राथमिक शाळेची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे सांगितले.

गोव्यातील मुलांना त्यांच्या गरजेच्या आणि पात्रतेच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरल्याचे सरकारने मान्य केल्यास आप या शाळांचा ताबा घेण्यास तयार आहे. आम्ही दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शाळेतील पटसंख्या कशी वाढवायची आणि शाळेचे निकालही कसे सुधारावयाचे ते दाखवू, असे पालेकर म्हणाले.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रत्येक गावात सरकारी प्राथमिक शाळा स्थापन करून शिक्षणाचा पाया घातला. या महान द्रष्टय़ा नेत्याने केलेल्या या विशिष्ट कृतीमुळे गोव्याला भारताच्या साक्षरतेच्या दरात सर्वोच्च स्थान मिळाले. मात्र अलिकडच्या वर्षांत भाजप सरकारने प्राथमिक शाळांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. शिवाय शिक्षणाचा दर्जाही घसरला आहे, असे पालेकर यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष ऍड. सुरेल तिळवे  आणि वाल्मिकी नाईक, राष्ट्रीय युवा विंगच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स, मुख्य प्रवक्ता राजदीप नाईक आणि सुनील सिग्नापूरकर उपस्थित होते.

Related Stories

‘अंडर ग्राऊंड फिल्डिंग’ला वेग

Amit Kulkarni

सत्तरीत विविध प्रकारच्या लागवडीला सुरुवात

Amit Kulkarni

पणजीत अवतरणार चंदेरी नगरी

Omkar B

माडेल येथील घाऊक मासळी बाजार तात्पुरता हलविणार

Amit Kulkarni

बेकायदा गुरांची कत्तलप्रकरणी तिघांना अटक

Omkar B

दिवाळीला पावसाची पुन्हा जोरदार हजेरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!