बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ही भारतातील अग्रगण्य सहकारी संस्था असून 213 शाखांच्या विस्तारित जाळय़ातून ग्राहकांना सेवा पुरवीत आहे. लोकमान्य सोसायटी लिमिटेड संचालित लोककल्प फौंडेशन हा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रम आहे. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. लोकांचे आर्थिक मान सुधारावे, यासाठी त्यांनी लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पारस बाल भवन मस्कल, टिटवाळा, महाराष्ट्र या दुर्गम गावात दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी लोककल्प फैंडेशनने अनाथ आणि वंचित मुलांना धान्य, डाळी, रिफाईंड तेल, साखर, गूळ आणि मसाल्यांचे वाटप केले.
पारस बाल भवनमध्ये सुमारे 90 टक्के अनाथ आणि वंचित मुले आहेत. त्यातील काही पालकांचे सरासरी मासिक उत्पन्न 3000 रुपयांपेक्षा कमी आहे. लोककल्प फैंडेशनने टिटवाळा-गोवेली रोड, गोवेली येथील अंकुर बाल विकास केंद्रात आणि खोणी, डोंबिवली पूर्व येथील अमेय पालक संघटनेने बांधलेल्या ‘घरकुल’ येथे अल्प उत्पन्न गटातील दिव्यांग विशेष मुलांना धान्य, डाळी, रिफाईंड तेल, शेंगदाणे, साखर, साबुदाणा, डिटर्जंट पावडर आणि साबणाचे वाटप केले. लोककल्प फौंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून किरण ठाकुर यांच्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातून सुद्धा सेवा पुरविण्याचा मानस आहे. लोककल्प फौंडेशनच्यावतीने देणगीदारांचे विशेष आभार मानण्यात आले.