Tarun Bharat

केंद्र सरकारच्या हातात आता सोशल मीडिया; नियम अधिक कडक

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

केंद्र सरकारने (Central Government)सोशल मीडिया वापरासंदर्भातले नियम कडक केले आहेत. यासाठी एक कमिटी नेमली आहे.सोशल मिडियाच्या कन्टेंन्टवर याची नजर असणार आहे. यासाठी मसुदाही तयार करण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्या यांच्यात आता नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोशल मीडियावर (Social Media)चुकीचा कन्टेंन्ट टाकणाऱ्यांवर आता सरकार नजर ठेवणार असून, सोशल मीडिया कंपन्यांचा ताबा आता स्वतःकडे घेणार आहे. यात कंपन्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.

नियम मोडल्यास अशी होणार कारवाई
केंद्र सरकारने घालून दिलेले नियम जर मोडले तर कडक कारवाई होणार आहे. यामध्ये अकाऊंट ब्लॉक करणे, अकाऊंट सस्पेंट करणे आणि काढून टाकणे याचा ताबा सरकार घेणार आहे. तसेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरील कन्टेंन्टवर नजर असणार आहे. तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी एकापेक्षा जास्त समित्या स्थापन करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Related Stories

राजस्थानमध्ये एका दिवसात 91 नवे कोरोना रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

मुंबई : सीबीआय कार्यालयात 68 पॉझिटिव्ह

datta jadhav

वारणा कारखान्याचा मार्च -एप्रिलमध्ये गळीतास येणाऱ्या ऊसाला जादा दर : विनय कोरेंची माहिती

Archana Banage

भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धेत प्रणिता फराकटे प्रथम

Abhijeet Khandekar

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

पंकजा मुंडेसाठी देवेंन्द्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले- चंद्रकांत पाटील

Archana Banage
error: Content is protected !!