मंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार
वार्ताहर /मडकई
माधवराव ढवळीकर ट्रस्टचे कार्य ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर हे यथायोग्य पार पाडीत आहे. समाजातील गरजूना हेरून त्यांची सुखदुःखे समजून करीत असलेल्या कार्याला तोड नाही. विविध क्षेत्रात मिथील ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून योगदान देताना सर्वांना बरोबर घेऊन जात आहेत. पूत्र म्हणून नव्हे तर त्यांचे नियोजन व समाजाचे फेडत असलेले ऋण पाहिल्यास तो निश्चितच अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन वीजमंत्री आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.
महालक्ष्मी बांदोडा येथील मगो कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक साहाय्य वितरीत करण्याच्या कार्यक्रमात मंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी मिथील ढवळीकर, मगो केंद्रीय समितीचे खजिनदार अनंत नाईक, वीज खात्याचे कार्यकारी अभियंते अरूण पाटील, सहाय्यक अभियंते केशव गावडे आदी उपस्थित होते.
नागेशी परिसरात अचानक उच्च वीजदाबामुळे दोन घरातील विद्युत उपकरणे निकामी झाली. घरातील भिंतीही काळय़ा ठिक्कर पडल्याने त्यांना नुकसानी सोसावी लागली. त्याबद्दल नुकसान भरपाई देत असल्याचे त्यांनी सांगितले. मिथील ढवळीकर म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून कार्य करण्यास खरोखरच आनंद प्राप्त होत असतो. या कार्यातून जनसामान्याच्या मनात अनोखे स्थान निर्माण होत असते. त्यातून तयार झालेले हे नाते एकमेकांनी जपायचे असते. तरच पूढचा विकास सहज सुंदर होत असतो.
दोन्ही नुकसानग्रस्त कुटुंबीयांना माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे धनादेश वितरीत करण्यात आले. स्वागत अनंत नाइं&क यांनी तर सूत्रसंचालन मिलींद सावईकर यांनी केले.