Tarun Bharat

शंकराच्या जयघोषात सोगल रथोत्सव

Advertisements

हजारो भाविकांची उपस्थिती

प्रतिनिधी /बेळगाव

श्रीक्षेत्र सोगल सोमनाथ येथील सोमेश्वर मंदिरात सोमवारी तिसऱया श्रावण सोमवारनिमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या रथातून भगवान शंकराच्या जयघोषात मंदिर परिसरात रथोत्सव काढण्यात आला. हजारो भाविकांनी या रथोत्सवामध्ये सहभाग घेतला.

श्रावण सोमवारनिमित्त सकाळी रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या रथाला केळीचे खांब, ऊस, नारळाच्या झावळय़ा, फुले आणि आंब्याच्या पानांच्या तोरणाने सजविण्यात आले होते. रथात सोमेश्वराच्या चंदीच्या मूर्तीची प्रति÷ापना करण्यात आली होती. संध्याकाळी होसूर येथील गुरु मडिवाळेश्वर मठाचे गंगाधर स्वामीजी आणि होसूर बैलहोंगलच्या प्रभू निलकंठ स्वामीजी यांनी पूजा करून रथोत्सवाला सुरुवात झाली. भक्तांनी रथावर अंजीर, केळी अर्पण केले.

मल्लूर पूरवंतांचा वडपू, नंदीकोलू यासह विविध वाद्यांमुळे रथोत्सवामध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. आमदार महांतेश कौजलगी, मोहनानंद स्वामीजी यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. 

Related Stories

गणाचारी गल्लीत कचऱयाचे साम्राज्य

Amit Kulkarni

क्लोजडाऊनमुळे बेळगाव पासपोर्ट कार्यालय बंद

Amit Kulkarni

विविध महामार्गांच्या कामांचा आज नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

Amit Kulkarni

शहरात समस्याच समस्या

Amit Kulkarni

नवहिंद क्रीडा केंद्र अध्यक्षपदी शिवाजी सायनेकर

Amit Kulkarni

महांतेशनगर पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टराची नियुक्ती करण्याची मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!