तरुण भारत

कुर्डुवाडी नगरपालिकेत नळधारकांची थकबाकी गोठवून २७ लाखाचा अपहार

कुर्डुवाडी : प्रतिनिधी

कुर्डुवाडी नगरपालिकेतील वसूली कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन १३० नळधारकांकडील सुमारे २७ लाखांची थकीत पाणीपट्टी गोठवून स्वतःचा तसेच थकबाकीदारांचा आर्थिक फायदा करुन घेत नगरपालिकेचे मोठे नुकसान केलेअसल्याचा आरोप नगरपालिकेचे कर्मचारी भारत साळवे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये केला आहे.

नगरपालिकेच्या १३० नळधारकांकडे नगरपालिकेची सुमारे २७ लाखांची पाणीपट्टी थकीत असून या थकीत पाणीपट्टी संबंधी गेल्या सहा ते सात वर्षापासून नगरपालिकेच्यावतीने वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली होती. याला थकबाकीदारांनी प्रतिसाद देत ती भरण्याची तयारीही दर्शवली होती. परंतू मध्यंतरीच्या काळात दि. १ फेब्रुवारी २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत वार्ड क्र.१ ते ५ मधील कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन या नळधारकांची सुमारे २७ लाख रुपयांची पाणीपट्टी गोठवून नळ कनेक्शनच्या नोंदी संगणकावरुन काढून टाकल्या आहेत. तरी संबंधित वार्ड क्र.१ ते ५ मधील संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतःचा १३ ते १४ लाख रुपयांचा फायदा करुन घेत थकबाकीदारांचाही १३ लाख रुपयांचा फायदा करुन दिला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये नगरपालिकेचे २७ लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय या थकीत नळधारकांचे नळ कनेक्शन संगणकावर दफ्तरी गोठवले असतानाही सद्यस्थितीत हे नळ चालू असल्याचे दिसत आहे. याची संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी असे वसुली कर्मचारी भारत साळवे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे.

नगरपालिकेचा यंदाचा पंचवार्षिक काळ या ना त्या कारणाने गाजत असताना प्रत्यक्ष नगरपालिका कर्मचाऱ्यांनेच संबंधित अपहार प्रकरणाची खुलासा केल्यामुळे नागरिकांत नगरपालिकेच्या कारभाराबाबत उलटसुलट चर्चा

Advertisements

Related Stories

शिवसेनेकडून नाशिकमधील भाजप कार्यालयाची तोडफोड

Abhijeet Shinde

राफेलच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून उड्डाण

datta jadhav

जम्मू काश्मीर : वैष्णो देवी मंदिर परिसरात भीषण आग

Rohan_P

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगना राणावत

Abhijeet Shinde

डीसीजीआयच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात फायझर, मॉडर्नासारख्या परदेशी लसी येण्याचा मार्ग मोकळा

Abhijeet Shinde

म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत विक्रमी वाढ

Patil_p
error: Content is protected !!