Tarun Bharat

घोळसगावात सर्पदंशाने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Advertisements

अक्कलकोट / प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील घोळसगांव येथे घरात एका सहा वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून सानवी परमेश्वर त्रिगुळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास सानवी गावातल्या अंगणवाडी वरून येऊन शाळेची पिशवी माळगीत ठेवत असताना विषारी सापाने उजव्या हाताला चावा घेतला. त्यावेळी हाताला सापाच्या दाताचे व्रण व रक्त दिसून आले आणि काही क्षणात सानवी बेशुद्ध पडली. ही बातमी गावात समजताच मोठी गर्दी जमली. गावात दवाखाना नसल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करता आले नाहीत. उपचारासाठी अक्कलकोट नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सानवीच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्रिगुळे कुटुंबाची परिस्थिती प्रतिकूल असून शेतीवर उदरनिर्वाह आहे. सानवीच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे.या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात वडील परमेश्वर त्रिगुळे यांनी खबर दिली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

अनिल देशमुखांविरोधात माफीचा साक्षिदार करा- सचिन वाझे

Kalyani Amanagi

महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 16 लाखांच्या उंबरठ्यावर!

Tousif Mujawar

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात!

Tousif Mujawar

५ हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

मुंबईत 35 लाखांचे मेथामफेटॅमिन जप्त

datta jadhav

मालदीव 15 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले

datta jadhav
error: Content is protected !!