सहा प्रवासी किरकोळ जखमी
अक्कलकोट प्रतिनिधी
बबलाद परमानंद तांडावरून अक्कलकोटकडे ( Akkalkot ) जाणारी एस.टी.( ST ) महामंडळाची बस क्रमांक एम.एच.१२.ई.एफ.६४९८ कलप्पावाडी गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने मल्लिकार्जुन बंडगर यांच्या शेतात बस पलटी झाली. बसमध्ये साधारणपणे ५० ते ६० प्रवाशी प्रवास करत होते.
स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, उडगी-कलप्पावाडी रस्त्या खुपच खराब आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये गाडी आदळल्याने बसचा टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती शेतात पल्टी झाली. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. चालक जाधव यांच्या प्रसंगासवधानमुळे सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाली आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने बाकीच्या सर्व प्रवाशीना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.
यादरम्यान अपघात झाल्याचे कळताच कलप्पावाडी व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरीकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. अशा प्रकारच्या गंभीर घटना भविष्यात पुन्हा घडू नये या करिता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागांनी लवकरात लवकर रस्ता दुरुती करून आणि रस्त्याला बाजूला वाढलेल्या काटेरी झाडे झुडपांची छाटणी करावी अशी मागणी या नागरिकांतून होत आहे.