खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत टाकल्याचा संशय; मंद्रूप पोलिसांकडून तपासाची चपे गतिमान
प्रतिनिधी / दक्षिण सोलापूर
मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगी परिसरातील नदीकाठावर अनोळखी मृतदेह आढळून आला असून याबाबत मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्मयातील भीमा नदीकाठावरील लवंगी परिसरात नदी काठावर 35 ते 40 वषीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद लवंगीचे पोलीस पाटील कुमार संगप्पा बगले (वय 31) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार पोलीस पाटील बगले यांना सरपंच सरपंच संगमेश्वरा बगले यांनी भीमा नदीपात्रात नदीकाठापासून 150 ते 200 मीटर अंतरावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी पाहणी केली. नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. मृतदेहाच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळल्याचे दिसून आले आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. याबाबतीत मंद्रूप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमितकुमार करपे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, महादेव मुळजे यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय मंद्रूप येथे शवविच्छेदनाकरिता हलविला.