Tarun Bharat

भुरीकवठेच्या पोलीस पाटलांसह ९ जणांविरुद्ध अट्रॉसिटी गुन्हा दाखल

भुरीकवठे येथील मारहाण प्रकरण

Advertisements

अक्कलकोट प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे महिंद्रा जीप गाडीस ट्रकने घासल्याने जीपला बांधलेले ढोल ताशे खाली पडले.याबाबत ट्रक चालकास जाब विचारत असताना गावातील जवळपास १० जणांनी जमाव जमवुन जातीवाचक शिवीगाळ करीत लाकडाने काठीने दगडाने लाथा- बुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केल्याबाबत भुरीकवठेच्या पोलीस पाटलांसह ९ जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आलूर ता उमरगा येथील पंचशील लेझीम संघ असे २५ जण मिळून नागलगांव ता आळंद जि गुलबर्गा येथे लेझिम खेळण्यासाठी गेले होते. त्यानंतर दि २ रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास भुरीकवठेच्या वळणावर समोरून एक ट्रक आली त्याचवेळी समोरून येणाऱ्या जीपगाडीस ( क्र: एम एच २५ ३७५६ ) घासल्याने जीपला बांधलेले ढोल- ताशे खाली पडले.याबाबत ट्रक चालकास जाब विचारत असताना त्या ठिकाणी भुरीकवठे येथील ३ मोटारसायकल वरून ९ जण आले व फिर्यादी आनंदा आणप्पा शिंदे वय २७ रा आलूर यांना शिवीगाळ करत अनोळखी इसमाने हातातील काठीने फिर्यादीस हाता – पायावर, पाठीत व डोक्यावर मारले. फिर्यादीस मारहाण करत असताना सोडवण्यासाठी आलेले प्रीतम अंबादास वस्के, आकाश पुंडलिक कांबळे, राहुल खंडू वस्के, सुरज दगडू कांबळे, किरण राम गायकवाड यांनाही वरील इसमाने त्याच्या सोबत आलेल्या नऊ जणांनी लाथाबुक्क्यांनी काठीने, हातापायावर,डोक्यात मारहाण करून जखमी केले हा प्रकार चालू असताना त्याच गावातील बसवराज इरके व त्याच्यासोबत दोघेजण आले यासोबत पोलीस पाटील शांताबाई बंगर्गी यांनी सुद्धा काठीने मारहाण करून जखमी केले व फिर्यादीच्या खिशातील दहा हजार रुपये एक मोबाईल काढून घेतला व फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमान केला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले फिर्यादी आनंदा आणप्पा शिंदे यांना मात्र सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. उपचार घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता मारहाण करणारे व पोलीस पाटील हे फिर्यादीस दिसून आल्याने ते ओळखले.म्हणून बसवराज हिरके व त्यांच्या सोबतचे दोन अनोळखी व्यक्ती,पोलीस पाटील शांताबाई बंगर्गी असे मोटारसायकलवरून आलेल्या ९ व पोलीस पाटील असे मिळून १० जणांविरुद्ध फिर्यादी

आनंदा आणप्पा शिंदे यांनी तक्रार दाखल केली असून वरील सगळ्या विरुद्ध अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस पाटील शांताबाई बंगर्गी, बसवराज हिरके, परमेश्वर भालचंद्र बंदीछोडे यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून उर्वरित ७ संशयित आरोपीचा शोध चालू आहे.या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर हे करीत आहेत.

Related Stories

BMC चा मोठा निर्णय; पहिली ते चौथीचे वर्ग बंदच राहणार

datta jadhav

पंजाबविरुद्ध वर्चस्व गाजवण्याचे दिल्लीचे इरादे

Patil_p

पंचगंगेच्या पातळीत दोन तासात सहा फुटांची वाढ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Abhijeet Khandekar

मराठा समाजाला आर्थिक दुर्बलांचे लाभ; ठाकरे सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

Abhijeet Shinde

अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे राजीनामा देण्यास तयार; विरोधी पक्षनेत्याचा दावा

Abhijeet Shinde

‘हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!