सोलापूर/प्रतिनिधी
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती उत्सव मिरवणुकीत पोलीस आयुक्त यांनी डॉल्बीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी पार्क चौक येथे रास्ता रोको केले.
दोन बेस दोन टॉपला परवानगी मिळावी याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त यांना विनंती केली होती. परंतु या विनंतीचा मान ठेवला नसल्याचे भीम सैनिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुनम गेट येथे आंबेडकर प्रेमींनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. धरणे आंदोलनाच्या दरम्यान अचानक पार्क चौक येथे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी जय-भीम च्या घोषणा देत रास्ता रोको केला. यामुळे सरस्वती चौक ते पार्क चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती.