शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज : कोणतीही जीवितहानी नाही : अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यास यश
प्रतिनिधी / पंढरपूर
पंढरपूर शहरातील स्टेशन रोडवरील कॉटन एक्स्पो मॉलला शुक्रवारी दुपारी आग लागली. दुकानातील कपडे, चपला व इतर साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तत्काळ अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भर दुपारी आग लागल्याने आग नियंत्रणात येत नव्हती. आगीचे लोट पसरल्याने शेजारील दुकाने बंद करण्यात आली होती. अग्निशामक दलाने प्रसंगावधान राखून आग वेळेत रोखल्याने शेजारील दुकानाचे नुकसान टळले आहे. आग लागताच रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी गर्दीला हटविले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजत नसले तरी शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगीत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण मॉल जळून खाक झाला आहे. आगीच्या कारणाचा व नुकसानीचा तपास पोलीस करीत आहेत.
पाचशे, शंभराच्या नोटा जळाल्या !
कॉटन एक्सपो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने मॉलमध्ये दररोज खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते. दररोज मोठी उलाढाल होत असल्याने पॅश काउंटरमध्ये जमा झालेली पॅशसुद्धा आगीत सापडल्याने नोटा पूर्णपणे जळालेल्या होत्या. जळीत असलेल्या पाचशे, शंभराच्या नोटांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात येत होती.