Tarun Bharat

Solapur; अक्कलकोट तालुक्यात या हंगामातील सर्वाधिक पाऊस; बोरगाव गावात पावसाचे रौद्ररूप

शेतीपिकाचे मोठे नुकसान; अनेक ओढ्याना पूर, जनजीवन विस्कळीत; कुरनुर धरणातून ६०० क्यूसेकने विसर्ग

अक्कलकोट प्रतिनिधी

आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले यासह आदी गावात पावसाने थैमान घालत शेतीपिकाचे मोठे नुकसान केले. घोळसगाव येथील तलाव १०० टक्के भरून वाहत आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव १०० टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, बादोले, वागदरी, शिरवळ, सापळे आदी भागात बुधवारी दुपारी दोन वाजता आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत होते.

गेल्या आठ दिवसापासून हवामानामध्ये कमालीची घट झाली असून आर्द्रतेबरोबरच उष्णतेच्या झळा सुद्धा सोसाव्या लागत होत्या. आज दि ३ रोजी दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बोरगाव येथील पीर राजे बागसवार साठवण तलाव, घोळसगाव तलाव भरले असून त्याच बरोबर घोळसगाव साठवण तलाव १०० टक्के भरला आहे. बोरगाव येथील कोळी तलावही १०० टक्के भरला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे ऊस, मुग, उडीद, सोयाबीन, तूर आदी पिके ज्यादा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. कामात शेतकरी व्यस्त असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे करत असताना तारांबळ उडाली. समाधानकारक पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वर्षभर पुरेल इतके पाणी या भागातील जलस्त्रोतात उपलब्ध झाले आहे.काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून काही भागात मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर उन्हाळ्यापेक्षा कडक उष्णता आणि सायंकाळी गार वाऱ्यासह पाऊस असे चित्र दरोज पाहायला मिळत आहे.

पुलावर पाणी असल्याने संपर्क तुटला बोरगाव नजीक असलेल्या पुलावर भरपूर पाणी वाहत असल्याने दुपार पासून ३घोळसगाव व वागदरी कडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद पडला होता.त्यामुळे गावचा संपर्क तुटला होता.
यंदाच्या हंगामातील सगळ्यात मोठा पाऊस पडला आहे.अडीच तास पडलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. काही क्षणातच संपूर्ण भाग जलमय झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला. बोरगाव गावातून खूप मोठ्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.

Related Stories

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणार

Archana Banage

देशद्रोही वसीम रिजवीविरुद्ध गुन्हा दाखल करा

Archana Banage

हत्तीकणबसच्या मठात मोठी चोरी; तीन लाखांचा ऐवज लंपास

Archana Banage

सोलापूर : बार्शीतील भाजी मंडई चालू करण्याबरोबर सुविधा देण्याची मागणी

Archana Banage

सोलापूर विद्यापीठाच्या लोकल टू ग्लोबल शिक्षणाची ‘ऑक्सफर्ड’कडून दखल !

Archana Banage

सोलापुरात रविवार वगळता सर्व दुकाने उद्यापासुन सुरु

Archana Banage