Tarun Bharat

उंच पुलावरून पडल्याने 12 काळविटांचा मृत्यू

प्रतिनिधी सोलापूर

सोलापुरात केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावर भटक्या कुत्र्याचा कळप काळविटांच्या मागे लागल्याने अंडरपास पुलावरखाली पडून झालेल्या अपघातात 12  काळविटांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर तीन काळवीट जखमी झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. देशमुख वस्ती येथील अंडरपास पुलाचा अंदाज न आल्यामुळे काळवीटच्या कळपाने ३५ फुटावर खाली उडी घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमी काळवीटींना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे केगाव येथील वन्य प्राण्यांचे अधिवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

केगाव विजापूर महामार्गावर बायपास रोडवरील अंडरपास बोगदा झाला आहे. या बोगद्यावरून सायंकाळच्या सुमारास काळवीट्यांचा एक कळप पुलावर चढला. काळविटाच्या कळपाला अंडरपासचा उंचीचा अंदाज न आल्याने साधारणपणे चाळीस फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृत पावलेल्या  काळवीट वनविभागात घेऊन गेले आहे. मात्र, वन्य प्राण्यांच्या अशा दुर्घटनेमुळे प्राणी प्रेमींनी मात्र हळहळ व्यक्त केली आहे. अपघातानंतर काळविटांना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Related Stories

सोलापूर : अपहरण झालेल्या दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत

Archana Banage

रामपूरमध्ये नियमबाह्य विवाह; पन्नास हजाराचा दंड

Archana Banage

सुशीलकुमार शिंदेंचा मोबाइल चोरणारा व्यापारी; संशयित आरोपीचे वडील राष्ट्रवादीचे पदाधिकारी

Archana Banage

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभास अभिवादन

prashant_c

सोलापूर : पंढरपूर, वैरागसह परिसरात मुसळधार पाऊस (व्हिडिओ)

Archana Banage

सोलापूर : बेडसाठी रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ सुरुच

Archana Banage