Tarun Bharat

Solapurमहाराष्ट्रात शिवसेना एकमुखी करण्यासाठी ठाकरे यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे : महेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेल्या शिवसेनेचे नाव व पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला मिळाले असून आता महाराष्ट्रात पूर्ण शिवसेना एक मुखी करण्यासाठी उद्धव
ठाकरे यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली काम करावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे. आज धनुष्यबाण शिवसेना नाव मिळाल्यानंतर करमाळा येथील शिवसैनिकांनी फटाक्याच्या आकाशबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख नागेश गुरव, सेनेचे निखिल चांदगुडे, विशाल गायकवाड, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड, पै दादा इंदुलकर, शिवसेना वैद्यकीय पक्ष सहप्रमुख शिवकुमार चिवटे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर,नागेश चेंङगे, रोहित वायबसे आदी जण उपस्थित होते.


या जल्लोषानंतर झालेल्या सभेत बोलताना महेश चिवटे म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गातून नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आशीर्वाद दिला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लागत असेल.


उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवाराच्या दावणीला बांधून सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लाचार कार्यकर्ते होण्याची वेळ आली होती मात्र स्वाभिमानी एकनाथ शिंदे यांनी उठाव करून राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसची या माध्यमातून खच्चीकरण केले आहे.


उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करून तमाम शिवसैनिकांच्या हितासाठी व हिंदूंच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून आगामी काळात राजकारण समाजकारण करावे असे आवाहन केले.

Related Stories

करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत; 861 उमेदवार रिंगणात

Archana Banage

अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्यास ठार करण्यात वनविभागाला यश

Archana Banage

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेच्या ४७० कोटींच्या आराखड्यास मान्यता

Archana Banage

Solapur : हसापूर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

सोलापूर : कुकडीचे खरीप आवर्तन करमाळा तालुक्यासाठी सोडावे – आ.संजयमामा शिंदे

Archana Banage

पालकमंत्री भरणे यांना बदलण्यास धनगर समाजाचा विरोध

Archana Banage