Tarun Bharat

करमाळा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या पदनिश्चितीस मंत्रिमंडळाची मान्यता

Advertisements

करमाळा : प्रतिनिधी

करमाळा येथे  वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिल्याचे करमाळा वकील संघाच्या माजी अध्यक्षा  अॅङ सविता शिंदे यांनी दिली.

करमाळा येथे बार्शी दिवाणी न्यायालयात मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहेत. करमाळा ते बार्शी हे अंतर 70 कि.मी. असून काही गावांचे अंतर बार्शीपासून 125-130 कि.मी. असून त्यामुळे वकील आणि पक्षकारांसाठी गैरसोय होत आहे. बार्शी येथे सध्या कार्यरत 3 न्यायालयांकडे एकूण 4186 दिवाणी प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी 1189 प्रकरणे नव्याने होणाऱ्या करमाळा दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केल्यास बार्शी दिवाणी न्यायालयात एकूण 2997 इतकी दिवाणी प्रकरणे प्रलंबित राहणार आहेत. या ठिकाणी एकूण 16 नियमित व 3 बाह्य यंत्रणेद्धारे अशा एकूण 19 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

करमाळा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आपण 2018 मध्ये दिला होता त्यावेळीच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाने मंजुरी देऊन त्यानंतर मंत्रीमंडळ उपसचिव समितीनेही मंजुरी दिली होती. याकामी आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. आत्ताही संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच मंत्रीमंडळ बैठकीत करमाळा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या पदनिश्चितीस मंजुरी मिळाली असल्याचे ऍड. सविता शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

Solapur; लाच स्वीकारताना बांधकाम विभागाचा कर्मचारी जाळ्यात

Abhijeet Khandekar

Solapur; बालिकेवर अत्याचार अन् खून; पती-पत्नीला मरेपर्यंत फाशी

Abhijeet Khandekar

पाच महिन्याच्या बाळाला घेऊन तिने माऊलीच्या पालखीसमोर रेखाटली रांगोळी

Abhijeet Khandekar

Solapur; बोरगांव गावानं जपलीयं साडेतीनशे वर्षांची परंपरा

Abhijeet Khandekar

लाच स्वीकारताना बांधकाम विभागाचा कर्मचारी जाळ्यात

Abhijeet Shinde

Solapur : अज्ञात कंटेनरच्या धडकेत गृहस्थाचा मृत्यु

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!