मारोळी / प्रतिनिधी
सलगर बुद्रुक (ता. मंगळवेढा) येथे एका 9 वर्षीय मुलीस खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून आपल्या दवाखान्यात तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डॉ. हरिप्रसाद पत्की खाजगी डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 9 वर्षीय मुलगी दि.2 रोजी दुपारी 1.30 वा. खाजगी शिकवणीला जात होती. या मुलीला खाऊचे आमिष दाखवून दवाखान्यात तिच्यावर अत्याचार केला असल्याची फिर्यादीत म्हटले आहे. तक्रार पोलिसात दाखल केल्यावर आरोपीस गजाआड केले आहे. डॉक्टरच्या या कृत्याबाबत संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीस अद्दल घडविण्यासाठी चांगला चोप दिल्याचीही चर्चा आहे. आरोपीविरूध्द भा.दं.वि.376 अ,ब,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील या करीत आहेत.
डॉक्टर हा बोगस असल्याची चर्चा
डॉक्टर हा बोगस असून गेल्या १५ वर्षा पासून वैद्यकीय सेवा देत होता. तसेच असे अनेक वेळा त्याने अनैसर्गिक अत्याचार केले असल्याचे चर्चा गावात आहे. गाव पातळीवर त्या मिटवल्या होत्या मात्र या नराधमाचे असेच कृत्य करत राहिल्याने अखेरीस उघडकीस आले असल्याचे चर्चा प्रसंगी गावात होत आहे. बोगस डॉक्टर असल्यास १५ वर्षात एकदाही कारवाई प्रशासनानाकडून झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.