Tarun Bharat

Solapur; खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची करमाळ्यात आढावा बैठक

अधिकाऱ्यांची केली कान उघडणी

Advertisements

करमाळा प्रतिनिधी

खा.रणजितसिंह नाईक- निंबाळकर आज करमाळा दौ-यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार समीर माने व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रथमच पांडे येथील शिक्षकांबद्दल तक्रार करताच त्याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तत्काळ निलंबीत करण्याची सूचना केली आहे. यावेळी उपस्थितांनी अनेक तक्रारी मांडल्या. प्रादेशीक नळ पाणी पुरवठाबाबतही अनेक तक्रारी आल्या. त्यावरुन अधिकाऱ्यांचीही त्यांनी कान उघडणी केली.

पांडे जिल्हा परीषद शाळा येथे ओहोळ व घाडगे हे शिक्षक तक्रार करुनही दूर्लक्ष करत होते. त्याची तक्रार बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अनिल तेली यांनी खासदार निंबाळकर यांच्याकडे केली होती.
तहसीलदार माने यांनी प्रथम प्रधानमंत्री किसान योजना, रेशन कार्ड (स्वस्त धान्य) योजनेची माहिती दिली. यावेळी 90 लाभार्थ्यांनी हक्क सोडला असून याचा सर्व्हे केला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन तालुकास्तरावर त्याची कशी अमलबजावणी केली जात आहे असे सांगितले. आपल्याकडे अजूनही पाऊस कमी झालेला आहे. मात्र ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे तेथील भरपाईसाठी प्रस्ताव दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, विठ्ठल भणगे, किरण बोकण, हरिदास ङांगे, आदिनाथचे माजी संचालक डॉ.वसंतराव पुंङे, साङेचे माजी सरपंच दत्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर महाद्ववार रोडवर वाहनांना नो एन्ट्री

Archana Banage

महाव्दार रोडवरील व्यापाऱ्यांची न्यायालयात धाव !

Archana Banage

हिंगणगाव येथे अवैध दारू व गांजा विक्री प्रकरणी महिला आक्रमक

Abhijeet Khandekar

रिक्षा व्यवसायिकांना एक वर्षांची फिटनेस मुदत द्या

Archana Banage

इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना बाधित बालकाची प्रकृती स्थिर

Archana Banage

रेंदाळात विषबाधेने 16 मेंढय़ाचा मृत्यू; तीन लाखांचे नुकसान

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!