Tarun Bharat

अक्कलकोट-तोळणूर रोडवरील अपघातात एक ठार; सहाजण जखमी

Advertisements

अक्कलकोट प्रतिनिधी

येथील अक्कलकोट-तोळणूर रस्त्यावर नागणसुर गावाजवळ कर्नाटक विभागाची बस व कारच्या भीषण अपघातामध्ये कारमधील एकजण मयत झाला असुन इतर सहाजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी २६ जुन रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. विनायक घोरसे (वय ४०) असे मयताचे नांव आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी, कर्नाटक परिवहन महामंडळाची बस के.ए.२८ एफ २२९७ ही विजापूर आगाराची बस सोलापूरहून तोळणूरमार्गे विजापूरकडे जात होती. तेव्हा तोळणूरवरून अक्कलकोटकडे येणारी कार ( एम.एच.१४ केबी ५८७७ ) बसला धडकली. या अपघातात कारचा चक्काचुर झाला असून कारमधील कारचालक विनायक घोरसे ( वय ४०) हे जागेवर मयत झाले. तर दीपक क्षिरसागर वय ५४, राघव निकम वय ५१, रमेश कोडतरकर वय ५८, रघुनाथ कोटोळे वय ५४, सचीन भ्रम्हणकर वय ४० व कन्हैय्यालाल सोनवणे वय ५४ सर्व रा. नाशिक गंभीर जखमी झाले. जखमींवर सोलापूर येथील शासकिय रूग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री उशिरापर्यंत दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

कॉम्रेड नामदेव गावडे यांना अखेरचा लाल सलाम

Sumit Tambekar

संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही, आदित्य ठाकरेंची मनसेवर जळजळीत टीका

datta jadhav

कोरोना : निधीसाठी भारत – पाकिस्तान मालिका खेळवा : शोएब अख्तर

prashant_c

13 वर्षांनी काश्मीरमध्ये एअर शो

Patil_p

राज ठाकरेंनी ‘या’ कारणासाठी मानले पीएम मोदींचे आभार

Abhijeet Shinde

केंद्र सरकारने ७४ कोटी लसीच्या डोसची मागणी नोंदवली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!