Tarun Bharat

Solapur : अज्ञात कंटेनरच्या धडकेत गृहस्थाचा मृत्यु

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सोलापूर-नगर राज्यमार्गावरील कंदर येथे कंटेनरने एका वृद्धाला चिरडल्याची घटना आज घडली आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजत आहे. अपघातातील ठार झालेल्या व्यक्तीचे नाव व इतर माहिती अद्याप समजू शकली नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी याच रोडवर करमाळ्यातील दोन तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर बरोबर ११ व्या दिवशी हा अपघात झाला आहे. या राज्यमार्गावरील करमाळ्याकडून टेंभूर्णीच्या दिशेने एक कंटेनर जात होता. तेव्हा कंदर येथील चौकात एक व्यक्ती रस्ता ओलांडत होती. त्यांना कंटेनरने जोराची धडक दिली. त्यात ते ठार झाले असल्याचे समजत आहे. मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा टेंभुर्णी या राज्यमार्गावर वारंवार अपघात होत असतात. य़ा अपघाताच्या सत्रामुळे येथील नागरिकांध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

ऑक्टोबरपर्यंत पाच नव्या लसी

Patil_p

इंदोरीकरांच्या ‘या’ वक्तव्याने नवा वाद रंगण्याची चिन्हे

datta jadhav

मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

Tousif Mujawar

कोल्हापूर शहरातील दूध विक्री उद्यापासून बंद

Archana Banage

हत्यारांचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर पावणेतीन लाखांची लूट

Abhijeet Khandekar

पत्रकारांनी वास्तवतेचे भान ठेवत लिखाण करणे गरजेचे – छत्रपती संभाजीराजे

Archana Banage