Tarun Bharat

महागाई व ईडीच्या विरोधात अक्कलकोटमध्ये काँग्रेसकडून निषेध..

Advertisements

अक्कलकोट प्रतिनिधी

देशातील मोदी सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील काँग्रेसक यज्ञडून राज्यात निषेध व्यक्त होत असताना अक्कलकोटमध्येदेखील मोदी सरकारच्या विरोधात महागाईबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच जीएसटी, ईडीचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रारंभी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी मधून निघालेल्या निघालेली मोर्चा अक्कलकोट मधील प्रमुख मार्गावरून स्टॅन्ड चौकात आली. या मोर्चामध्ये विशेषतः महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध असो, महागाई से जनता बेहाल, या जुलमी सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अशा प्रकारच्या जोरात घोषणा दिल्या.यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, शीतल म्हेत्रे, माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, सुनिता हडलगी,मंगल पाटील, अश्पाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, बाबासाहेब पाटील,सिद्धार्थ गायकवाड, मल्लिकार्जुन काटगाव, बसवराज अल्लोळी,अय्याज चंदनवाले, मल्लु भासगी, रामु समाणे, अश्पाक अगसापुरे, अरुण जाधव, सद्दाम शेरीकर, प्रवीण शटगार,मुबारक कोरबु यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

म्हेत्रेंची चौफेर फटकेबाजी..

दरम्यान या निषेध मोर्चात बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. महाविकास आघाडीने जनतेचे भले केले हे बघवले नसल्याकारणाने ईडीचा गैरवापर करून महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याची खंत म्हेत्रे यांनी व्यक्त केली.महागाईमुळे जनता बेहाल झाली असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.परंतू तरीही याबाबत मोदी सरकार गंभीर नाही.यासाठी आगामी काळात या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्व निवडणूकीत भाजपाला नाकारण्याचे आवाहन केले.

Related Stories

डाळिंब बागांना उन्हाचा फटका, काय आहेत उपाययोजना ?

Abhijeet Shinde

पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

‘डीआरएटी न्यायालयाचा रोहित पवारांना दणका, आदित्यनाथ साखर कारखाना सहकारी तत्वावर राहणार?

Rahul Gadkar

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान

Nilkanth Sonar

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुन्हा गजबजणार; विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटेंची नियुक्ती

Abhijeet Shinde

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील अडीच लाखाचे दागिने लांबविले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!