हिरेहब्बू वाडय़ातील घटना, 1140 वर्षातील हस्तलिखित अमूल्य ग्रंथ
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यांचा ताम्रपटावर अच्चकन्नड भाषेत लिहिलेला 50 पानी आत्मचरित्राची चोरी झाला. ही घटना उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाडय़ात गुरुवारी रात्री 11.30 नंतर घडली. दरम्यान, पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत सागर राजशेखर हिरेहब्बू (रा. उत्तर कसबा, हिरेहब्बू निवास) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाडा (निवास) येथे परंपरेप्रमाणे श्री शिवयोगी सिद्धेश्वर पूजास्थान आहे. त्याठिकाणी सागवानाच्या पेटीत श्री सिद्धेश्वर महाराज यांचा चरित्रग्रंथ जपून ठेवण्यात आला होता. त्याची नित्य पूजा-अर्चा हिरेहब्बू यांच्याकडून होत असते. दरम्यान, गुरुवारी पहाटे आणि सकाळची पूजा झाल्यानंतर पूजा स्थानाचे दार नेहमीप्रमाणे पुढे करून हिरेहब्बू यांच्याकडून कडी लावून दार बंद करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे 4.30 च्या वेळेस पूजेकरिता गेल्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराजांचा चरित्रग्रंथ असलेली पेटी आणि इतर साहित्य नसल्याचे फिर्यादी यांना दिसून आले. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू आणि इतरांना फिर्यादी यांनी याबाबतची माहिती दिली.
दरम्यान गुरुवारी रात्री 11.30 नंतर हिरेहब्बू निवासाचा मुख्य दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी पहाटेनंतर तो उघडण्यात आल्याचे हिरेहब्बू यांच्याकडून सांगण्यात आले. यावरून गुरुवारी रात्रीच ग्रंथाची चोरी झाली असावी, असा संशयही हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही पॅमेऱयात पांढऱया रंगाच्या कपडय़ात दोघेजण काहीतरी लपवून घेऊन जात असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांनीच चरित्रग्रंथ चोरल्याचे अद्याप तरी नक्की सांगता येणार नाही असेही सांगण्यात आले. सागवानी पेटीला लोखंडी पट्टी लावून ग्रंथ ठेवण्यात आला होता. कटावणीच्या सहाय्याने लोखंडी पट्टी उचकटून ग्रंथ चोरल्याचे दिसून येते. या गुह्याचा तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.
हत्तीवरून चरित्रग्रंथाची मिरवणूक काढली होती
1140 ला कवी राघवाक यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांचे आत्मचरित्र कच्चकन्नड भाषेत लिहिले. हा ग्रंथ 50 पानांचा असून यामध्ये नऊ अध्याय आहेत. या अध्यायामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्याकाळी या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती असे सांगण्यात आले.
ग्रंथाचे मूल्य जाणणाऱ्याकडूनच चोरी
सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथाची मागणी होत होती. परंतु हिरेहब्बू यांनी ग्रंथ देण्यास नकार दिला होता. आता तोच अमूल्य ग्रंथ चोरी झाला असल्याने ग्रंथाचे मूल्य जाणणाऱयाकडूनच जाणून बुजून गंथाची चोरी करण्यात आली असावी असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.