Tarun Bharat

Solapur; विवाहितेची मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या; घातपातीचा संशय

Advertisements

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे एका विवाहितेने मुलासह पेटून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजली दत्तात्रय आंबारे (साधारण वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलाचे नाव समजू शकलेले नाही. घरापासून काही अंतरावर ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समजली असून नेमकी ही आत्महत्या की हत्या हे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

गौडरे येथे मंगळवारी (ता. २८) तारखेला विवाहितेने आत्महत्या केली. विवाहितेची पती दत्तात्रय आंबारे हे गवंडी काम करत असल्याचे समजत आहे. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा गावात अंगणवाडीत जातो तर दुसरा लहान मुलगा आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले आहे.

Related Stories

बाबा बर्फानीचे लाईव्ह दर्शन सुरू

Patil_p

खुल्या जागेवर नमाज पठण करण्यास मुख्यमंत्री खट्टरांचा विरोध

Abhijeet Shinde

शिवसेनेचं बंड होणारच होतं; उदयनराजेंनी सांगितले यामागचं कारण

Abhijeet Khandekar

घरात न बसणारे हॉस्पिटलमध्ये आणि नियम तोडणारे तुरुंगात दिसतील : अजित पवार 

prashant_c

विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलले पाऊल..!

Abhijeet Shinde

शिवसेना मविआतून बाहेर पडणार पण… राऊतांनी घातली ‘ही’अट

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!