Tarun Bharat

Solapur : बारा लाख जनावरांचे होणार लसीकरण

लंपीचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

सोलापूर / प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी या गावात लंपी बाधित दहा जनावरे आढळून आल्याने सध्या पशुपालकांत चिंतेचे वातावरण आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिह्यातील 12 लाख 41 हजार 858 जनावरांना गोटफॉक्स ही लस देण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी सांगितले.

देशात व राज्यभरात जनावरांना होणारा लंपी आजार वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील 17 जिह्यातील 59 तालुक्यातील जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने या रोगाबाबत पशुपालकांना जनजागृती करुन सूचना देण्यात आल्या आहेत. हा आजार किटक, डास, गोचीड, गोमाशा यांच्यापासून पसरत असल्याने पशुपालकांनी जनावरांच्या गोठय़ात किटकनाशक फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथील 1 हजार 573, बचेरी 1 हजार 298, काळमवाडी 1 हजार 699 अशा 4 हजार 570 लसी जनावरांना देण्यात आल्या आहेत. सध्या या भागातील जनावरांचा लंपी आजार बरा होत आला आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने 27 हजार लसीचा साठा करुन ठेवला आहे. जनावरामध्ये लंपी आजार होत असल्याच्या भीतीने नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण होत आहे. लंपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

तर लंपी आजाराच्या प्रादुभार्वामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास पशुपालकास नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. लंपी आजाराचा सामना करण्यासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री अशा विविध बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी 2022-23 मधील उपलब्ध निधीतून एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Related Stories

Pandharpur By Election Result 2021 Updates: ३७३३ मतांनी भाजपाचे समाधान अवताडे विजयी

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 38 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage

सोलापूर : खतांचा काळाबाजार, बार्शी भाजपचे बांधावर ठिय्या आंदोलन

Archana Banage

सोलापूर शहरात ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

सोलापूर शहरात 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

Archana Banage

लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांच्या शिधापत्रिका होणार रद्द

Archana Banage