Tarun Bharat

डॉक्टर तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Advertisements

कुर्डुवाडी : प्रतिनिधी

सीना नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या डॉक्टर तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि.४ मे रोजी दु.१.३० वा. पूर्वी सीना नदीपात्रात बंधाऱ्याजवळ रिधोरे ता. माढा येथे घडली. रेहान अरिफ सय्यद (वय २६ वर्ष रा. कसबा पेठ, इंदापूर जि. पुणे) असे मृत झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अवेज जलील मौलानी (वय २१ वर्षे रा. कसबा पेठ इंदापूर जि. पुणे) यांच्या खबरीवरून कुर्डुवाडी पोलिसांत अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की मयत डॉ. रेहान अरिफ सय्यद यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे (रा म्हैसगाव ता माढा) यांच्या शेतात सुट्टीसाठी डॉक्टर रेहान आले होते. दुपारी उष्णतेचा पारा वाढू लागल्याने डॉ. रेहान हे अमन सय्यद व जिब्रान सय्यद यांच्यासमवेत सीना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहण्याचा आनंद घेताना डॉ. रेहान यांना आपण पोहता पोहता बंधाऱ्याच्या दाराजवळ आलो हे समजलेच नाही. बंधाऱ्याच्या दाराजवळ नदीच्या प्रवाहाचा वेग अधिक होता. यामुळे पोहताना पाण्यातच डॉ. रेहान यांना थकवा आल्यामुळे त्यांना नदीपात्राच्या कडेला येता आले नाही. ते नदीपात्रात बुडाल्याने त्यांची शुद्ध हरपली. यावेळी त्यांच्यासमवेत पोहायला आलेल्या अमन व जिब्रान यांनी त्याला तेथून बेशुद्धावस्थेतच नदी पात्राच्या बाहेर काढले. उपचारासाठी कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले असता. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे सांगितले.डॉक्टर रेहान यांचे पुणे येथील महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण झाले असून सध्या ते सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. 

Related Stories

चुना मागण्यावरून तुंबळ हाणामारी, एकाच भोसकून खून

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : मागील 24 तासात 62,194 नवे कोरोनाबाधित, 63,842 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P

उद्या जाहीर होणार राज्यासाठी नवे निर्बंध : उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Sumit Tambekar

लग्न मंडपात महिलांनी चुलीवर स्वयंपाक करीत केला गॅस दरवाढीचा निषेध

Abhijeet Shinde

आंध्र प्रदेशात 20 जूनपर्यंत वाढविला कोरोना कर्फ्यू!

Rohan_P

पत्रकारावर हल्ल्याचे कृत्य चुकीचे : मंत्री कदम

Sumit Tambekar
error: Content is protected !!